स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात सुरू असलेल्या बारचा परवाना बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा परवाना बनावट पद्धतीने देण्यात आल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे या बार परवान्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे
याविरोधात आज गोव्यात युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. स्मृती इराणी यांचा आसगाव बार्देश येथील बेकायदेशीर कॅफे आणि बार त्वरित बंद करण्यासाठी युवक काँग्रेसच्या सदस्यांनी कुलूप आणि चावी पोलिसांकडे सुपूर्द केली.
याचबरोबर स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी युवा कॉंग्रेसच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. एकंदरीत परिस्थितीमुळे स्मृती इराणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, स्मृती इराणी यांची मुलगी झोईश हिचा काहीही संबंध नाही. विरोधकांनी केलेले सर्व आरोप निराधार असून आरोप राजकीय सूडबुद्धीने केले असल्याचे स्पष्टीकरण झोईश यांचे वकिल किरत नागरा यांनी दिले. झोईश यांनी देखील एका निवेदनाद्वारे अवैध रेस्टॉरंट, बारची मालकी आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे.