
सातारा
शिवथर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले
सातारा (महेश पवार) :
साताऱ्यातील शिवथर येथे पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास क्रेटा कार मधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. अवघ्या सात मिनिटात एटीएम फोडून या एटीएम मधील रोकड लंपास केली आहे.मात्र या एटीएम मध्ये किती रोकड होती हे समजू शकलेले नाही.या घटनेनंतर तात्काळ तालुका पोलीस स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.