google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘वणव्यांवर नियंत्रणासाठी सरकार तयार करणार सर्वसमावेशक प्लॅन’

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अभयारण्ये, जंगल परिसरात लागलेल्या आगींबाबत आज वनमंत्र्यांच्या उपस्थितती आढावा बैठक झाली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गृह मंत्रालय तयार करत असलेल्या राष्ट्रीय वन आग प्रतिबंध आणि व्यवस्थापन आराखड्यात गोव्याचा समावेश करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), गृह मंत्रालय, केंद्र सरकार, NDMA चे सदस्य, MoEFCC, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या अधिकारी उपस्थित होते.

CWLW सौरभ कुमार यांनी गोव्यातील आगीची अद्ययावत स्थिती, आगीचे स्वरूप आणि संभाव्य कारणे याबाबत सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा, भारतीय नौदल यासह लाईन विभागांच्या समन्वयाची माहिती देण्यात आली.

या सर्व घटकांकडून होत असलेल्या कृतीकार्यक्रमावरही सादरीकरण करण्यात आले. भारतीय हवाई दल समुदाय, स्वयंसेवक आणि इतरांचे सहकार्य याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, 5 मार्चपासून आत्तापर्यंतच्या काळात एकूण 71 फायर स्पॉट्स विझवण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि अतिरिक्त सचिवांनी वन विभागाला आगीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे मूल्यांकन करून लवकरात लवकर सुधारात्मक उपाययोजना राबविण्याचा सल्ला दिला.

जंगलातील आग रोखण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकार एक व्यापक वन अग्नि व्यवस्थापन योजना तयार करणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!