google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘पायभरणीच्या दोन वर्षानंतरही कामाचा पत्ता नाही…’

मडगाव : 2023 मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावातील दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन केले होते. रावणफोंड रेल्वे स्थानकाजवळ सहापदरी रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) व खारेबांद पुलापासून रावणफोंड सर्कलपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण. मात्र वर्षभर उलटून गेले तरी या प्रकल्पांचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही, असा आरोप मडगावचो आवाज व  युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे.


सदर प्रकल्पांच्या पायाभरणीला दोन वर्षे झाल्याचे सांगून, प्रभव नायक यांनी आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवर एक पोस्ट प्रसारीत केला व त्यात “अकार्यक्षमतेचा दुसरा वर्धापन दिन. खारेबांद ते रावणफोंड पर्यंतच्या रोड ओव्हर ब्रिज आणि रस्ता रुंदीकरणाच्या भव्य पायाभरणी समारंभाला दोन वर्षे झाली आहेत. अजूनही प्रकल्पाचा ‘पाया’ दिसण्याची मडगावकर वाट पाहत आहे. कदाचीत, अदृश्य काँक्रीटचा वापर केला जात असावा” असा खोचक टोला हाणला व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना फटकारले.


सुमारे ८४ कोटी रुपये खर्चाचे हे प्रकल्प गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीएसआयडीसी) मार्फत राबवले जाणार होते. या प्रकल्पांमुळे मडगाव शहरातील वाहतूक कोंडी व रस्त्यांची खराब अवस्था सुधारण्याची अपेक्षा होती. पण आजही नागरिक त्याच अडचणींना सामोरे जात आहेत, असा दावा प्रभव नायक यांनी केला.


मुख्यमंत्र्यांनी त्याच कार्यक्रमात जाहीर केलेले आणखी दोन महत्त्वाचे प्रकल्प आधुनिक कदंबा बस स्थानक व दक्षिण गोव्याच्या जिल्हा  इस्पितळाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय यांचाही काही ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी हे प्रकल्प चार वर्षांच्या आत पूर्ण होतील, असा शब्द दिला होता. पण सध्याची स्थिती पाहता, त्या घोषणांचा जनतेवर विश्वास बसणं कठीण आहे, असे प्रभव नायक म्हणाले.


मडगावच्या जनतेने आता प्रतीक्षा करण्यापेक्षा उत्तर मागण्याचा निर्धार केला पाहिजे. हे प्रकल्प अद्याप का सुरू झालेले नाहीत? शासकीय यंत्रणांचे व सरकारचे दुर्लक्ष यामागे आहे का? यावर सरकारने तातडीने उत्तर द्यावे आणि ठोस कृतीसह काम सुरू करावे, अशी मागणी आम्ही करतो, असे प्रभव नायक म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!