झाडांच्या हत्ये प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार…
सातारा :
येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुल बाहेर असणाऱ्या बाजार संकुलात अडथळा ठरणाऱ्या बदामाच्या झाडाची विनापरवाना तोड केल्याची धक्कादायक घटना नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनाद्वारे समोर आली आहे. 14 वर्षाच्या जपलेल्या बदामाच्या झाडाला निर्दयीपणे विनापरवाना तोडल्यामुळे वृक्षप्रेमी मध्ये संतापाची लाट उसळी आहे.
या बदामाच्या वृक्षाच्या तोडीनंतर या वृक्षाला सांभाळणाऱ्या या बदामाच्या वृक्षाला वृक्षाला सांभाळणाऱ्या वृक्षप्रेमींनी या तोडीचा निषेध व्यक्त करत प्रतीकात्मकरित्या मृत झालेल्या झाडाला दहावा तिसरा असे कार्यक्रम क्रीडा संकुल शेजारील असलेल्या बाजार संकुलासमोर साजरे केल्याने सर्व सातारकरांचे लक्ष वेधले आहे.
व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या बदामाच्या झाडाची तोड झाल्याचे समोर येत आहे मात्र नगरपालिकेच्या वतीने तसेच संबंधित वृक्ष विभागाच्या वतीने परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी वृक्षतोड करणाऱ्या या मोबाईल व्यवसायिकावर कारवाई करावी अशी मागणी येथीलच वृक्षप्रेमी नागरिकांनी बोलताना केली आहे.
सातारा शहरांमध्ये पालिकेच्या वतीने शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राबवताना शहरातील विविध चौक तसेच मुख्य रस्त्यांवर वृक्षारोपणाची कार्यक्रम केले होते. यामध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांची लागवड त्याचे संवर्धन वृक्षप्रेमी नागरिक तसेच पालिकेच्या वतीने नित्य नियमाने करण्यात आले होते. पालिकेच्या वृक्ष विभागाने तसेच साताऱ्यातील सजग वृक्षप्रेमींनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलासमान वाढवलेल्या 14 वर्षाच्या बदामाच्या झाडाची बेकायदेशीर रित्या विनापरवाना वृक्षतोड केल्याने या घटनेचा स्थानिक व्यावसायिकांसह वृक्षप्रेमींनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
सातारा नगरपालिकेच्या वृक्ष विभागाने विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दिनांक 19 सप्टेंबरला पालिकेला देऊन देखील अद्याप संबंधितांवरती कोणतीही कारवाई झाली नसल्याने राजकीय दबावापोटी ही कारवाई टाळली जात असल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.
सातारा शहरांमध्ये एका बाजूला गरज असताना आवश्यकता असताना वृक्षतोडीसाठी पालिका अडमुठे पाण्याची भूमिका घेऊन वृक्षतोडीची परवानगी नाकारते. मात्र ज्या ठिकाणी विनापरवाना वृक्षतोड झाली आहे अशा ठिकाणी कारवाई करत असताना दिसत नाही त्यामुळे एकूणच पालिकेचा वृक्ष विभाग रुक्ष झाल्याच्या चर्चा वृक्ष प्रेमींमध्ये रंगले आहेत. लवकरच संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पर्यावरण प्रेमींसह तमाम वृक्ष प्रेमींनी दिला आहे.