खऱ्या अर्थाने लोकांचा अर्थसंकल्प सादर : मुख्यमंत्री
Union Budget 2023:
मोदी सरकारने त्यांच्या दुसऱ्या टर्मचा अखेरचा आणि 2023 -24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, पायाभूत सुविधा, महिला, करप्रणाली, रेल्वे अशा सगळ्या क्षेत्रांबाबत तरतूदी करण्यात आल्या आहेत.
महत्वाची बाब म्हणजे करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, भांडवली गुंतवणूकीत 33 टक्के वाढ करण्यासह एक कोटी शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंगकडे वळवण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
“आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींचे धेय्य सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याला अधोरेखित करणारा आहे. खऱ्याअर्थाने लोकांचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे आभार मानतो. अर्थसंकल्पात शेतकरी, उपेक्षित क्षेत्र, तरुण, एमएसएमई, ओबीसी महिला, उद्योजक, पगारदार यांच्या आशा-आकांक्षा समाविष्ट केल्या आहेत आणि ग्रीन-ग्रोथ, स्टार्टअप्स तसेच स्थानिक उत्पादन क्षेत्रांवरही मोठा भर देण्यात आला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.