
डॉ.आंबेडकर विद्या प्रसारक मंडळाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
यवतमाळ:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्या प्रसारक मंडळ नेर द्वारा संचालित डॉ.आंबेडकर विद्यालय व कला,एच.एस.व्ही.सी.कनिष्ठ महाविद्यालय वटफळी,ता-नेर,जिल्हा-यवतमाळ येथील एस.एस.सी.बोर्डाचा निकाल (83.92%) टक्के लागला आहे.
ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमानंतर 51 वर्षाच्या यशाची परंपरा कायम ठेवून डॉ. आंबेडकर विद्यालय,वटफळी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.परीक्षेला एकूण 56 विदयार्थी प्रविष्ठ झाले पैकी 47 विदयार्थी उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण झाले आहे.

डॉ. आंबेडकर विद्यालय, ही एक अशी शाळा आहे की जवळपास आजूबाजूच्या 6 गावाची गरीब कष्टकरी कस्तकारांची मुले इथे शिक्षण घेतात,ही शाळा 51 वर्षांपासून निःशुक्ल शिक्षण देत आहे.
2023 या वर्षाच्या निकाल मध्ये शाळेतून
प्रथम- कु.रोहिणी साहेबराव बन्सोड (88.60%)
द्वितीय-कु.प्रतीक्षा अरूणराव जगमते(84.80%)
तृतीय-चि.अमन अनिलराव बन्सोड आलेले आहे.(81.80%)
वरील 3 विध्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक अनिल वाघमारे, पर्यवेक्षक चव्हाण,जेष्ठ शिक्षिका बन्सोड, जेष्ठ शिक्षक डुकरे, टाले,भोरकडे, कावरे यांनी घरी जाऊन पुष्पगुच्छ व मिठाई देऊन मुलांचे कौतुक केले.