google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

व्हिडिओकॉनचे सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक

व्हिडिओकॉनचे (Videocon) सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. चंदा कोचर यांच्या पाठोपाठ सीबीआयने लोन फ्रॉड केसमध्ये मोठी कारवाई केली आहे.

चंदा कोचर या जेव्हा आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ होत्या त्यावेळी ३ हजार २५० कोटींचं लोन नियम डावलून देण्यात आलं होतं. व्हिडीओकॉन (Videocon) ग्रुपला हे लोन दिलं गेलं होतं. त्यानंतर व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचा आर्थिक फायदा करून दिला होत्या. याच वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे.

२०१२ मध्ये व्हिडिओकॉन (Videocon) ग्रुपला आयसीआयसीआय बँकेद्वारे लोन देण्यात आलं होतं. हे प्रकरण नंतर एनपीए झालं. तसंच हा फ्रॉडही कसा झाला तेदेखील समोर आलं. २०२० मध्ये ईडीने या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली. २०१२ मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वात ICICI बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला ३२५० कोटींचं कर्ज दिलं. त्यानंतर वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटींचं लोन दिलं. या कंपनीत दीपक कोचर ५० टक्के भागिदारी होती. त्यामुळे हा सगळा घोटाळा कसा झाला ते समोर आलं. आता या प्रकरणात वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे.

ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे शेअर होल्डर अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना ICICI च्या सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांनी एकमेकांचा लोन प्रकरणात कसा फायदा करून दिला या सगळ्या बाबी सविस्तर लिहिल्या होत्या. धूत यांच्या व्हिडिओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटींचं लोन दिलं. त्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक यांचा व्यावसायिक फायदा करून दिला. अरविंद गुप्ता यांच्या पत्रानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!