google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘मैं अटल हूँ’ची पहिली झलक आली समोर…

बहुआयामी अभिनेते  पंकज त्रिपाठी (pankaj tripathi)  सध्या त्यांच्या आगामी अटल बिहारी वाजपेयी (atal bihari vajpayee) यांच्या बायोपिकमुळे चर्चेत आहेत. आज अखेर या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

गेले अनेक महिने पंकज त्रिपाठी (pankaj tripathi) या चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी एक पोस्ट शेअर करत या चित्रपटात काम करताना त्यांना कसं वाटतंय हे सांगितलं होतं. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटलं होतं की, “खूप उत्साह थोडी भीती, मनामध्ये अनेक भाव मात्र निष्ठा पक्की, अटलजींच्या भूमिकेसाठी हे समर्पित, आता मी अटल आहे. अटलजींसारखे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणं कुठल्या ही परीक्षेपेक्षा कमी नाही, मात्र या परीक्षेत त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे.” त्यामुळे या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते.

 

या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत या चित्रपटातील पंकज त्रिपाठी (pankaj tripathi) यांची पहिली झलक दाखवली. मी जाधव यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी  (atal bihari vajpayee) यांच्या वेशभूषेमध्ये दिसत असून पंतप्रधान, कवी, राजकारणी, उत्कृष्ट माणूस अशा विविध बाजू फोटोंच्या माध्यमातून उलगडत आहेत. तर हा व्हिडीओ सुरु असताना ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटाचं गाणं ऐकू येत आहे.

‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. डिसेंबर २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!