google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

Oscar मध्ये ‘ओपनहायमर’चा डंका; पहा पूर्ण यादी…

ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. अत्यंत प्रतिष्ठित अशा या पुरस्कार सोहळ्याकडे असंख्य कलाकार आणि चाहत्यांचं लक्ष लागून होतं.

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या चित्रपटाला सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली होती. ‘बार्बी’, ‘पुअर थिंग्स’ आणि ‘ओपनहायमर’ या तीन चित्रपटांचा बोलबाला या पुरस्कार सोहळ्यात पहायला मिळाला. ‘ओपनहायमर’ने सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शनासह सात ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत.

तर एमा स्टोनला ‘पुअर थिंग्स’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोण-कोण विजयी ठरले, ते पाहुयात..

ऑस्कर 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- डेवाइन जॉय रँडॉल्फ (द होल्डोवर्स)
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म- वॉर इज ओव्हर! इन्स्पायर्ड बाय द म्युझिक ऑफ जॉन अँड योको (डेव्ह मुलीन्स आणि ब्रॅड बुकर)
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म- द बॉय अँड द हेरॉन (हायाओ मियाझाकी आणि तोशियो सुझुकी)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले- ॲनाटॉमी ऑफ अ फॉल (जस्टीन ट्रेट आणि आर्थर हरारी)
सर्वोत्कृष्ट ॲडाप्टेड स्क्रीनप्ले- अमेरिकन फिक्शन (कॉर्ड जेफरसनने)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग- पुअर थिंग्स (नाडिया स्टेसी, मार्क कुलियर आणि जॉश वेस्टन)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- पुअर थिंग्स (जेम्स प्राइस आणि शोना हिथ यांचं प्रॉडक्शन डिझाइन, सुसा मिहालेकचं सेट डेकोरेशन)
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन- पुअर थिंग्स (होली वॅडिंग्टन)
सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म- द झोन ऑफ इंटरेस्ट (दिग्दर्शक- जोनाथन ग्लेझर)
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- गॉडझिला मायनस वन (ताकाशी यमाझाकी, कियोको शिबुया, मासाकी ताकाहाशी आणि तात्सुजी नोझिमा)
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- ओपनहायमर (जेनिफर लेम)

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्टफिल्म- द लास्ट रिपेअर शॉप (बेन प्राऊडफुट आणि क्रिस बॉवर्स)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म- ट्वेंटी डेज इन मारियुपोल (मॅस्टिस्लाव्ह चेरनोव्ह, मिशेल मिझनर आणि राने अरॉन्सन)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ओपनहायमर (होयटे वॅन होयटेमा)
सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म- द वंडरफूल स्टोरी ऑफ हेनरी शुगर (वेन अँडरसन आणि स्टिव्हन रेल्स)
सर्वोत्कृष्ट साऊंडसाठी- द झोन ऑफ इंटरेस्ट (टार्न विलर्स आणि जॉनी बर्न)
सर्वोत्कृष्ट म्युझिक (ओरिजिनल स्कोअर)- ओपनहायमर (लुडविग गोरानसन)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- बिली आयलिश आणि फिनियास ओकॉनेल (बार्बी- व्हॉट वॉस आय मेड फॉर?)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- किलियन मर्फी (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- ओपनहायमर (ख्रिस्तोफर नोलन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- एमा स्टोन (पुअर थिंग्स)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ओपनहायमर (एमा थॉमस, चार्ल्स रोवन आणि ख्रिस्तोफर नोलन)

..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!