
”हा’ तर माझ्यासाठी अभिमानाचा क्षण’
मी पुरातत्व विभागाकडुन गोव्यातील अधिसूचित ठिकाणांची माहिती घेण्यासाठी तारांकित प्रश्न विचारला होता. मला संपूर्ण गोव्यातील ५१ स्थळे अधिसुचीत केल्याचे यादीसह लेखी उत्तर मिळाले अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
पुरातत्व खात्याच्या उत्तरात कुंकळ्ळी येथील चिफटेन्स मॅमोरीयल, मडगाव येथील लोहीया मैदान, पणजीचे आझाद मैदान, असोळणा व पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके तसेच गोवा क्रांती चळवळ आणि गोवा मुक्ती लढा यांच्याशी संबंधित स्मारके आणि ठिकाणे सरकारने अधिसूचित केलेली नाहीत असे स्पष्ट झाले. चांदोर येथील प्राचीन महादेव मंदिर देखील सदर यादीत नाही असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
मी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला आणि सदर ऐतिहासीक ठिकाणांचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व सरकारने सदर ऐतिहासीक स्थळे तातडीने अधिसूचित करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला सकारात्मक उत्तर देऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचा मला आनंद आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
मला आशा आहे की सरकार लवकरात लवकर अधिसूचना जारी करेल आणि गोव्यातील अशा सर्व ऐतिहासीक स्थळांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेईल, असे युरी आलेमाव म्हणाले.