google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

गॉडमॅनकडून द्वेष की मत्सर? : प्रभव नायक

वाहतूक बेटांवर आणि मोकळ्या जागेवर काहीही उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही असे कारण सांगून नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे मडगावचो आवाजचे शुभेच्छा फलक गॉडमन दिगंबर कामतांच्या तालावर नाचणाऱ्या मडगाव नगरपालीकेने काढले. गॉडमॅनचा हा द्वेष की मत्सर? मी या नकारात्मक मानसिकतेचा निषेध करतो, असा सणसणीत टोला युवा नेते प्रभव नायक यांनी हाणला आहे.

मडगाव नगरपालीकेने पालीका इमारतीच्या मागील चौकात तसेच बँक ऑफ बडोदा चौकात लावलेले नाताळ व नवीन वर्ष शुभेच्छा फलक हटविण्याच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करत प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालीका पक्षपातीपणाचा अवलंब करीत असल्याची टीका केली.

या फलकांमुळे एकप्रकारे जीर्ण अवस्थेत असलेल्या मडगावमधील वाहतूक बेटांचा कुरूप चेहरा झाकण्यास थोडीफार मदत झाली होती. फलक लावण्यापूर्वी आणि काढल्यानंतर आम्ही प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये लोकांना तो फरक स्पष्ट दिसून येईल, असा दावा प्रभव नायक यांनी केला.

परोपकारी कुटुंबातील एका व्यावसायिक आस्थापनाने उभारलेल्या महाकाय ख्”रिसमस ट्री” ने शहराची कुरूपता झाकण्यास थोडीफार मदत झाली. मडगावच्या सार्वजनीक जाग्यांचे व्यवस्थापन मडगाव नगरपालीका योग्य प्रकारे करत नाही हे उघड आहे. आमचे फलक व्यवस्थित चौकटीत फ्रेम करुन पद्धतशीरपणे लावलेले होते. मडगाव नगरपालीकेकडून योग्य शुक्ल भरून परवानगी घेवूनच सदर फलक लावले होते, असा दावा प्रभव नायक यांनी केला.

मडगाव नगरपालीका आता काही निवडक व्यक्तींचे फलक आणि बॅनर लावण्यास परवानगी देते का यावर आमचे लक्ष असेल. सर्वांसाठी समान नियम असावेत आणि त्यांची निःपक्षपातीपणे अंमलबजावणी करावी, असे प्रभव नायक म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!