
ललित पंडित आणि जावेद अख्तर यांची जोडी ‘मन्नू क्या करेगा?’मध्ये करतेय जादू
क्युरियस आयज सिनेमा निर्मित मन्नू क्या करेगा? च्या ट्रेलर आणि अल्बममधील पहिल्या गाण्यांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे . ‘हमनवा’, ‘सैयाँ’, ‘फना हुआ’, आणि ‘तेरी यादें’ ही गाणी आधीच श्रोत्यांच्या मनात घर करून बसली आहेत.
या संगीतमय प्रवासात भर टाकत निर्मात्यांनी आता दोन नवी गाणी प्रदर्शित केली आहेत – ‘गुलफाम’ आणि ‘हल्की-हल्की बारीश’, जी ललित पंडित यांच्या बहुआयामी संगीत प्रतिभेचं दर्शन घडवतात.
‘गुलफाम’ हे स्टेबिन बेनच्या मधुर आवाजातलं, मनाला भिडणारं गाणं आहे, ज्याचे भावस्पर्शी बोल स्वतः लिजेंडरी जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. आत्म्याला भिडणाऱ्या सुरावटींनी सजलेलं हे गाणं अल्बमचं सौंदर्य अधिक खुलवतं.
‘हल्की-हल्की बारीश’ हे रोमँटिक बॅलेड आहे, ज्यात शान आणि अक्षरी कक्कर यांच्या सुरेल आवाजाने जादू केली आहे. पुन्हा एकदा जावेद अख्तर यांच्या शब्दांनी या गाण्याला प्रेम आणि ओढीचं हळवं स्पर्श दिला आहे, जे प्रत्येक श्रोत्याच्या मनाला भिडणार आहे.
अल्बमच्या संकल्पनेविषयी बोलताना संगीतकार ललित पंडित म्हणाले, “मन्नू क्या करेगा? या चित्रपटासाठी आमचं ध्येय असं होतं की, आजच्या प्रेक्षकांशी जुळणारं पण त्याचवेळी जुन्या चालींचं माधुर्य जपणारं एक अजरामर साऊंडट्रॅक तयार करायचं. ‘गुलफाम’ भारतीय संगीताची शुद्धता आणि आत्मा व्यक्त करतं, तर ‘हल्की-हल्की बारीश’ प्रेमाच्या कोमल भावनांना स्पर्श करतं. या अल्बममधील प्रत्येक गाणं काळजीपूर्वक तयार केलं आहे, जेणेकरून ते दीर्घकाळ लोकांच्या हृदयात राहील.”
विनय पाठक, कुमार मिश्रा, राजेश कुमार आणि चारू शंकर यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट 2025 मधील भारतीय रोमँटिक म्युझिकल शैलीला नवा आयाम देणार आहे.
नवीन चेहरे, हळवे भाव आणि केंद्रस्थानी संगीत – मन्नू क्या करेगा? हा चित्रपट या वर्षातील सर्वात हृदयस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. हा जादुई प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सज्ज व्हा – चित्रपट 12 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण देशभर प्रदर्शित होत आहे.