google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

मुंबई :

सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचं निधन झालं आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचं वयाच्या 61 वर्षी निधन झालं. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

80, 90 च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती राहिली आहे. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच सुप्रसिद्ध आहेत.

प्रेमा किरण यांनी उतावळा नवरा, थरकाप या चित्रपटांची निर्मिती देखील केली. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेत त्यांनी काम करत चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!