
महाराष्ट्र
गोठ्याला आग, जनावरांचा होरपळून मृत्यू
अमरावती (अभयकुमार देशमुख) :
दिवसेंदिवस आग लागल्याचा घटना घडताहेत. नुकताच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दीपोरी येथे, मारोती टाले यांच्या गुरांच्या गोठयाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात ४ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण कळू शकले नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच आमदार प्रताप अडसड घटनास्थळी दाखल झालेत.वेळीच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र आग मोठी असल्याने यात मारोती टाले यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आग विझविण्यासाठी गेलेले मारोती टाले देखील यात जखमी झाल्याची महिती आहे.