google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्र

राज्यसभा निवडणूकीत महविकास आघाडीला मोठा धक्का

मुंबई:

मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

शुक्रवारी सकाळपासून या मतदानाला सुरुवात झाली होती. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा दावा केला जात होता. मात्र, मध्यरात्री झालेल्या मतमोजणीमध्ये संजय पवार यांना फक्त ३८ मतं मिळाली असून धनंजय महाडिकांना ४१ मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!