
Padma awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजाच्या जनहितासाठी काम करणाऱ्या नायक आणि वीरांना देशाच्या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी ३० नावांची घोषणा केली आहे. गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, भीमसिंग भावेश, डॉ.नीरजा भाटला, ॲथलीट हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर होमिओपॅथी चिकिस्तक असलेल्या डॉ. विलास डांगरे आणि वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, मध्य प्रदेशातील उद्योजिका शैली होळकर, मराठी लेखक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना पद्मश्री देण्यात येणार आहे. दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला, सामाजिक कार्यकर्ते भीमसिंह भावेश, पुद्दुचेरी येथील थविल वादक पी. दत्चनमूर्ती, पश्चिम बंगालमधील धक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योग शिक्षिका शेखा एजे अल सबा, उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यूग आणि कॉलीन गँटझर, नागालँडमधील फळ उत्पादक एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, कादंबरीकार जगदीश जोशीला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पद्मश्री पुरस्कार :
एल हँगथिंग (नागालँड)
हरिमन शर्मा (हिमाचल प्रदेश)
जुमडे योमगॅम गामलीन (अरुणाचल प्रदेश)
जोयनाचरण बथारी (आसाम)
अरेन गुरुंग (सिक्कीम)
विलास डांगरे (महाराष्ट्र)
शैखा ए जे अल शबाह (कुवैत)
निर्मला देवी (बिहार)
राधा बहीन भट्ट (उत्तराखंड)
सुरेश सोनी (गुजरात)
पंडी राम महादेवी (छत्तीसगड)
जोनास मॅसेट्ट (ब्राझील)
जगदीश जोशिला (मध्य प्रदेश)
हरविंदर सिंह (हरयाणा)
भेरू सिंह चौहाण (मध्य प्रदेश)
वेकप्पा अमबाजी सुगातेकर (कर्नाटक)
पी डछनामुर्ती (पुद्दुचेरी)
लिबीया लोबो सरदेसाई (गोवा)
गोकुळ चंद्र दास (पश्चिम बंगाल)
हघ गँटझेर (उत्तराखंड)
कोलेन गँटझेर (उत्तराखंड)
डॉ. नीरजा भाटला (दिल्ली)
साल्य होळकर (मध्य प्रदेश)