अर्थमत/ टेक्नॉलॉजी

आयएचसीएलचे जिंजर आणि एशियन पेंट्स रॉयल प्लेची भागीदारी

मुंबई इंडियन हॉटेल्स कंपनी, या भारतातील सर्वात मोठ्या हॉस्पिटॅलिटी कंपनी कंपनीचा लीन लक्स ब्रँड जिंजरने भारतामध्ये सजावट आणि रचना नावीन्यातील आघाडीची कंपनी एशियन पेंट्ससोबत भागीदारी केली आहे. आतिथ्यशीलता आणि रचना यामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल अशी ही याप्रकारची पहिलीच भागीदारी आहे. या दोन कंपन्यांनी मिळून जिंजर गोवा, कँडोलिममधील आठ एक्सक्लुसिव्ह खोल्यांचे रूपांतर एका वेगळ्या जगात घेऊन जाणाऱ्या, रचनाशैलीच्या साहाय्याने घडवण्यात आलेल्या अनुभवांमध्ये केले आहे. एशियन पेंट्सच्या इटालियन कलेक्शनमधील लक्झरीयस रॉयल प्ले टेक्स्चर्स दर्शवत या भागीदारीने पाहुण्यांच्या आतिथ्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या अंतर्गत सजावटीला एक नवा पैलू प्रदान केला आहे, ज्यामध्ये रंग, पोत आणि फिनिश यांची अभिरुचीपूर्ण सांगड घालून याठिकाणी व्यतीत केलेला काळ म्हणजे सर्व संवेदनांना प्रफुल्लित करणारा अद्भुत अनुभव निर्माण करण्यात आला आहे.

इथे येणाऱ्या पाहुण्यांना मिळणारा अनुभव अनोख्या पद्धतीने वृद्धिंगत करण्यासाठी जिंजर आणि एशियन पेंट्सने ‘ए रॉयल टच’ या संकल्पनेअंतर्गत जिंजर गोवा, कँडोलिमच्या एका संपूर्ण मजल्यावर सर्जनशीलतेच्या साहाय्याने परिवर्तन घडवून आणले आहे. यासाठी फक्त एशियन पेंट्स रॉयल प्ले टेक्स्चर्सचा वापर करण्यात आला आहे, जे कलात्मक फिनिशेस आणि भिंतीला स्पर्श करून अनुभवता येणारी कलाकृती बनवण्याच्या क्षमतेसाठी नावाजले जातात. यामुळे प्रत्येक कानाकोपऱ्यात अप्रतिम टेक्स्चर्स, इटालियन रचनांचा प्रभाव आणि भावनिक सखोलता यांचा अनुभव घेता येतो. या सगळ्याचा प्रभाव होऊन लक्झरीचा एक नवा स्तर तयार झाला आहे, ज्यामध्ये रॉयल प्लेच्या भावपूर्ण आणि अर्थपूर्ण रंगसंगती प्रमुख भूमिका बजावत आहेत. रॉयल प्ले हा ब्रँड टेक्श्चरमध्ये बाजारपेठेत सर्वात आघाडीवर आहे, या ब्रँडने जिंजरच्या पाहुण्यांना एक अनोखा अनुभव प्रदान केला आहे.

 

कॅनवास ड्यून आणि कोरोला कर्व सूट्समधील शांत, पाकळ्यांच्या फॉर्मेशन्स असोत किंवा कॉरिडॉर्समधील मार्मोरिनो मल्टीटोनची सेमी-पॉलिश्ड शान असो, प्रत्येक पृष्ठभाग अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने सजवण्यात आल्याने एक अनोखा मूड निर्माण करतो. फ्रेस्को कॅल्क आणि स्टुको पोज सूट्समधील calcecruda mirror stucco paladeo tile आणि Royale Glitz reserve luxury emulsion फिनिशेस खोली, चकाकी आणि टिकाऊपणा प्रदान करतात. राहण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि दिसायला सुंदर व आकर्षक असल्याने इथे राहणाऱ्यांच्या मनोवृत्ती प्रफुल्लित होतात.

आठपैकी प्रत्येक खोलीची शैली निराळी आहे, नैसर्गिक घटक व कलात्मक फिनिशेसपासून प्रेरणा घेऊन प्रत्येक खोलीत वेगळी सजावट करण्यात आली आहे. नवीन रचनांसाठी वापरण्यात आलेले टोन आणि टेक्श्चर भिंतींना त्यांची एक अनोखी कहाणी प्रदान करतात. जिंजर आणि एशियन पेंट्स यांनी आपल्या रचना भाषेतून आतिथ्यशीलतेमध्ये एक नवी दिशा खुली केली आहे, याठिकाणी आतिथ्य आणि उच्च प्रतीच्या रचना यांचा संगम राहण्यासाठी, विश्रांतीसाठी अशा जागा निर्माण करतो ज्या अर्थपूर्ण आणि संस्मरणीय देखील आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!