
ऍक्सिस बँकेचे Q3FY26 चे निकाल : ऑपरेटिंग नफा तिमाही 9% ने, निव्वळ नफा 28% ने वाढला
ॲक्सिस बँकेने आज Q3FY26 चे निकाल जाहीर केले असून, ₹6,490 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. Q3FY26 मध्ये बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वार्षिक 5% आणि तिमाहीत 4% वाढून ₹14,287 कोटी झाले. Q3FY26 साठी बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन (NIM) 3.64% होते. तिमाही सरासरी शिलकीचा (QAB) विचार करता, एकूण ठेवी तिमाही आधारावर 5% आणि वार्षिक आधारावर 12% ने वाढल्या. MEB CASA गुणोत्तर 39% होते, जे मोठ्या बँकांमधील सर्वोत्तम बँकेपैकी एक आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी, बँकेचे नोंदवलेले एकूण NPA आणि निव्वळ NPA अनुक्रमे 1.40% आणि 0.42% पर्यंत सुधारले, जे 30 सप्टेंबर 2025 रोजी 1.46% आणि 0.44% होते. Q3FY26 साठी शुल्क उत्पन्न वार्षिक आधारावर 12% वाढून ₹6,100 कोटी झाले. किरकोळ शुल्क वार्षिक आधारावर 12% वाढले; आणि बँकेच्या एकूण शुल्क उत्पन्नाच्या 71% होते. एकूण भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (CAR) 16.55% होते, तर CET 1 गुणोत्तर 14.50% होते, जे तिमाहीच्या तुलनेत 7 बेसिस पॉइंट्सने वाढले.
संपत्ती व्यवस्थापन व्यवसाय हा बँकेच्या भारतातील सर्वात मोठ्या व्यवसायांपैकी एक आहे, ज्याच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 31 डिसेंबर 2025 रोजी ₹6,87,738 कोटी रुपये होती, ज्यात गेल्या तिमाहीत 7% आणि वार्षिक 8% वाढ झाली. बँकेच्या देशांतर्गत उपकंपन्यांनी स्थिर कामगिरी केली असून, आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या 9 महिन्यांत त्यांचा निव्वळ नफा (PAT) ₹1,490 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 6% जास्त आहे.
बँकेने आपला चांगलाच विस्तार केला असून 31 डिसेंबर 2025 रोजी देशांतर्गत 6,110 शाखा आणि विस्तार काउंटर तसेच 3,315 केंद्रांमध्ये स्थित 281 बिझनेस करस्पॉन्डंट बँकिंग आउटलेट्स (बीसीबीओ) इतके होते. 31 डिसेंबर 2024 रोजी देशांतर्गत शाखा आणि विस्तार काउंटर 5,706 होत्या, तर 3,122 केंद्रांमध्ये स्थित 202 बीसीबीओ होते.
ऍक्सिस बँकेचे एमडी अँड सीईओ अमिताभ चौधरी म्हणाले, “ग्राहकांच्या आवश्यक गरजांवर तातडीचे उपाय शोधण्याकडे असलेले आमचे लक्ष म्हणजे या तिमाहीतील आमची प्रगती. यात कर्जाची सुलभ उपलब्धता, डिजिटल बँकिंगची पुनर्कल्पना आणि भविष्य घडवणाऱ्या कल्पनांमध्ये गुंतवणूक करणे, याचा समावेश होतो. आमचे प्लॅटफॉर्म आधुनिक करून, आमच्या कर्मचाऱ्यांना सक्षम करून आणि स्मार्ट तसेच क्रांतिकारी उपायांद्वारे ग्राहकांच्या वर्तनातील बदलांच्या पुढे राहून आम्ही आमची स्पर्धात्मकता सातत्याने अधिक मजबूत करत राहू.”


