परळीच्या वाटेवर कचऱ्याचे पर्यटन ?
सातारा (महेश पवार) :
तालुक्यातील परळी खोरं म्हणजे निसर्गाचा अद्भुत खजाना मिळणारं ठिकाण , उरमोडी धरण , सज्जनगड , ठोसेघर ,चाळकेवाडी सह अनेक प्रेक्षणीय ऐतिहासिक वारसा लाभलेला परिसर. या परळी च्या वाटेवर सातारा शहरातील काही सुशिक्षित सातारकरांच्या मार्नीग वॉकला आल्यावर जाता जाता कचर्याची पिशवी टाकायच्या उद्योगांनी अक्षरश: परळीच्या वाटेवर कचर्याचे ढीग तयार झाल्याने येणाऱ्या पर्यटकांना जाता येता कचर्याचे पर्यटन होत असल्याचीही चर्चा सुरू आहे.
या ठिकाणी मॉर्निंग वॉकला राजकीय सामाजिक कार्यकर्ते येत असतात. तरीदेखील परळीच्या वाटेवर कचर्याचे पर्यटन होत असताना देखील आवाज उठत नसल्याने आता प्रश्नावर कोण उठवणार असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.