google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

पेटीएमचे ‘या’ प्रसिद्ध कंपनीसोबत टायअप

मुंबई :

रसना या जगातील सॉफ्ट ड्रिंक कॉन्सेन्ट्रेटची विक्री करणा-या सर्वात मोठ्या कंपनीने, तसेच मेक इन इंडियाच्या आयकॉनने पेटीएम या भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनीसोबत सहयोगाने नवीन जाहिरात मोहिम सुरू केली आहे, जी ग्राहकांना जवळपास १०० टक्के कॅशबॅक देते. यासह रसना ३२ ग्लास पॅक्स, १० ग्लास पॅक्स व रूपये ५ पॅक्स खरेदी करणा-या ग्राहकांना त्वरित कॅशबॅक मिळेल.

ग्राहक पॅक खरेदी करून पेटीएम अॅपच्या माध्यमातून पॅकवरील पेटीएम क्यूआर कोड स्कॅन करत या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकतात. कॅशबॅक्सव्यतिरिक्त चित्रपट तिकिटे बुकिंग्ज, फ्लाइट बुकिंग्ज, मोबाइल व डीटीएच रिचार्ज अशा बाबींवर अनेक इतर ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. पेटीएमसह युजर्सना पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, पेटीएम पोस्टपेड (बाय नाऊ, पे लॅटर), नेटबँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्डसच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा आहे.

रसनाची उत्पादने आरोग्यदायी व रसाळ म्हणून ओळखली जातात, ज्यामध्ये फळांचा अर्क, ११ जीवनसत्वे, मिनरल्स व ग्लुकोजचा समावेश आहे. ही उत्पादने विविध फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहेत जसे नागपूर ऑरेंज, अल्‍फोन्‍सो मँगो, अमेरिकन पायनाप्पल, शाही गुलाब, कूल खूस, केसर ईलायची, मसाला निंबू, शिकंजी लिंबू पानी, लिची आणि काला खट्टा.

रसना ग्रुपचे अध्यक्ष पिरूझ खंबाट्टा म्हणाले, “आम्हाला भारतातील सर्वात मोठे पेमेंट व्यासपीठ पेटीएमसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो, ज्यामुळे आम्हाला दैनंदिन पेमेंट्ससाठी पेटीएमचा वापर करणा-या लाखो युजर्सपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. दोन्‍ही ब्रॅण्ड्स अभिमानाने मेड इन इंडिया आहेत आणि त्‍यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये अग्रस्थानी राहिले आहेत. या कडक उकाड्यामध्ये रसना आवश्यक आहे, म्हणून जवळपास १०० टक्के कॅशबॅक वरदान आहे. ‘रसना बिल्‍कुल फ्री’ रसनाचे लक्ष्य ग्राहक असलेले समाजातील मध्यमवर्गीय व अल्प विभागांसाठी वरदान आहे.”

पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले, “रसना देशभरातील लोकप्रिय सॉफ्ट ड्रिंक आहे आणि आम्हाला ग्राहकांना उन्हाळ्यादरम्यान काहीसा दिलासा देण्यासाठी त्यांच्यासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. ग्राहकांना प्राधान्य देणारा ब्रॅण्ड म्हणून पेटीएम भारतातील क्यूआर कोड क्रांतीमध्ये अग्रस्थानी आहे आणि युजर्सना पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, पेटीएम पोस्टपेड (बाय नाऊ, पे लॅटर), नेटबँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्डसच्या माध्यमातून सोईस्कर डिजिटल पेमेंट्स सेवा देते.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!