google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘जून अखेरपर्यंत महिला आयुक्त नेमा, अन्यथा मोर्चा’


पणजी:

एप्रिल आणि मे महिन्यात नोंदवलेल्या आठ लैंगिक छळाच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना, आम आदमी पार्टी महिला शाखेच्या अध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी भाजप सरकारला गुन्हेगारी न्याय व्यवस्था मजबूत करण्यास आणि महिलांवरील गुन्हे कमी करण्यासाठी ठोस कारवाई करण्यास सांगितले.

महिला आयोग गेल्या तीन महिन्यांपासून प्रमुखाशिवाय कार्यरत आहे. भाजप सरकारने निवडणूक जिंकल्यावर उत्सवांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आणि त्यानंतर खात्यांचे वाटपही करण्यात आले. मात्र, या उत्सवात त्यांना महिला आयुक्त नेमण्याचा विसर पडला, अशी टीका कुतिन्हो यांनी केली.

कुतिन्हो यांनी विश्वजीत राणे यांना महिनाभरात महिला आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आप महिला विंग, महिला व बाल विभागासमोर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.  याशिवाय सरकारने शाळांमध्ये लैंगिक शिक्षण तसेच अल्पवयीन मुलांसाठी योग्य समुपदेशन सत्रे लागू करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

पक्षाच्या पणजी कार्यालयात पत्रकार परिषदेत  कुतिन्हो म्हणाल्या, “गेल्या महिन्यात एका आठवड्यात लैंगिक छळाची तीन प्रकरणे नोंदवली गेली. मे महिन्यात आतापर्यंत पाच प्रकरणे नोंदवली गेली.  विक्टीम असिस्टंस युनिट अनेक वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित करूनही, महिला आणि बालविकास मंत्री यांनी अल्पवयीन किंवा महिलांच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.”

त्या पुढे म्हणाल्या, “भाजप सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी पिंक फोर्स सुरू केली असताना, महिलांविरुद्धच्या अनेक गुन्हा ऐकिवात येत आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, “अपहरण/बेपत्ता/पलायन” या श्रेणीतील 13 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. किशोरवयीन प्रेमासंबंधित प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आहे. ही एक मोठी चिंतेची बाब आहे, म्हणूनच शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आणि समुपदेशन सत्रे लागू करणे महत्त्वाचे आहे.”

महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे हे महिला आणि अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत, असे प्रतिपादन आपच्या उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स यांनी केले. अनेक पदांवर ते कार्यरत असल्याने महिला व बाल विभाग पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भाजप सरकारने महिला व बालविकास मंत्रीपदी महिला आमदाराची नियुक्ती करून राणे यांचा भार हलका करावा अशी मागणी रॉड्रिग्स यांनी यावेळी केली.


भाजपच्या महिला विंगवर जोरदार हल्ला चढवताना रॉड्रिग्स म्हणाल्या, “एकेकाळी या विषयावर आंदोलन करणारी भाजप महिला विंग त्यांच्याच सरकारने बलात्कार आरोपीला पक्षात सामावून घेतल्याने आता गायब झाली आहे. ज्यांचा रेकॉर्डच असा आहे ते भाजप सरकार महिलांचे संरक्षण कसे करणार?”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!