अर्थमत/ टेक्नॉलॉजी

हातमोज्यांशिवाय केसांना रंग देणे शक्य…

मुंबई : केसांना रंग देताना हातमोजे, ब्रश किंवा मिक्सिंग बाऊल वापरण्याची गरज आता राहणार नाही. गोदरेज समूहातील हेअर लॅबने हातमोज्यांशिवाय थेट हातांनी वापरता येणारे ‘गॉदरेज हेअर लॅब स्मार्ट ब्लॅक शॅम्पू हेअर कलर’ हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. पेटंटेड फॉर्म्युलेशन आणि ऑटो-ऑक्सिडेटिव्ह तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या उत्पादनामुळे घरच्या घरी केसांना रंग देण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, हे उत्पादन अमोनिया आणि पेरॉक्साइडमुक्त असून त्यात गॅलिक अॅसिड आणि अ‍ॅलोव्हेराचा वापर करण्यात आला आहे. उत्पादनाचा वापर करण्यासाठी प्रथम हात पाण्याने ओले करून ते कोरड्या केसांवर लावावे लागते. उत्पादन हातांच्या संपर्कात आल्यानंतर तीन मिनिटांच्या आत साबणाने हात स्वच्छ धुण्याच्या सूचना कंपनीने दिल्या आहेत. सुमारे १५ मिनिटांत केसांना नैसर्गिक दिसणारा गडद काळा रंग मिळतो आणि पांढऱ्या केसांना १०० टक्के रंगाचे कव्हरेज मिळते, असा कंपनीचा दावा आहे.

या उत्पादनासाठी मल्टी-यूज ट्यूब पॅकेजिंग देण्यात आले असून, प्रत्येक वेळी रंग तयार करण्यासाठी वेगळे मिश्रण करण्याची आवश्यकता नाही. पारंपरिक हेअर कलर वापरताना करावी लागणारी तयारी आणि स्वच्छतेची प्रक्रिया कमी करण्याच्या उद्देशाने हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे.

या उत्पादनाच्या सादरीकरणावेळी हेअर लॅबचे बिझनेस हेड समीर सूर्यवंशी म्हणाले, “हेअर कलरच्या पारंपरिक वापरातील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही उत्पादनाच्या रसायनशास्त्रात बदल केला आहे. हातमोज्यांची गरज दूर करणे आणि रंग लावण्याची प्रक्रिया अधिक सोपी करणे, हा या नवकल्पनेमागील मुख्य उद्देश आहे. प्रगत विज्ञान आणि वापरण्याची सुलभता यांचा मेळ साधून ग्राहकांना घरच्या घरी प्रीमियम सेल्फ-केअर अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

भारतातील हेअर कलर बाजारपेठेचे मूल्य सात हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. घरच्या घरी केसांना रंग देण्याच्या उत्पादनांची वाढती मागणी आणि वापरातील सुलभतेला ग्राहकांकडून मिळणारे प्राधान्य यामुळे या बाजारपेठेचा विस्तार होत आहे. केसांना रंग लावताना त्वचेवर डाग पडणे आणि वापरानंतर स्वच्छतेसाठी करावी लागणारी कसरत या समस्या लक्षात घेऊन कंपनीने नवे उत्पादन विकसित केले आहे.

सूर्यवंशी यांच्या मते, सोयीस्कर वापर आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रीमियम उत्पादनांना हेअर केअर क्षेत्रात वाढती मागणी आहे. स्मार्ट ब्लॅक शॅम्पू हेअर कलरच्या माध्यमातून या श्रेणीत नवीन ग्राहक जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

हे उत्पादन ८० मिलीच्या पॅकमध्ये २२९ रुपये किमतीला उपलब्ध आहे. ब्लिंकिट, अ‍ॅमेझॉन यांसह प्रमुख ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना ते खरेदी करता येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!