कास पठारावर लाखो पर्यटक येत असतात यांना सोईसुविधा मिळाव्यात म्हणून स्थानिक आपापल्या परीने छोटे स्टॉल उभे करून आपली घर चालवत असताना यांच्या गरिबीचा फायदा घेत धनदांडग्यांनी कवडी मोल भावात विकत घेत स्वर्ग सुखाचा आनंद देणार्या कास पठाराला ओरबाडून वृक्षतोड आणि उत्खनन करून सर्व नियम फाट्यावर मारत आपली रिसॉर्ट आणि हॉटेल उभारली आणी त्या ठिकाणी आपली दुकाने थाटली आणी इथल्या जमिनदारालाच रखवालदार म्हणून काम करण्याची वेळ आणली .तर दुसरीकडे इथल्या स्थानिकांनी कर्ज काढून जमिनी विकून स्वतः आपला व्यवसाय टाकला तर त्यांच्या पाऊलो पाऊली हाय क्लास हॉटेल रिसॉर्ट उभारल्याने स्थानिकांच्या व्यवसायांवर यामुळे परिणाम झाला आहे .
खरंतर हे सगळं प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय वरदहस्त यामुळे कास पठारावर फुलं नव्हे तर हॉटेल्स आणि रिसॉर्ट उमलतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली . यामुळे सातारा- जावली चे तहसिलदार तलाठी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी निसर्ग प्रेमी व स्थानिक करत आहेत .त्याच बरोबर परकिय धनदांडग्यांनी केलेली अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात आहे . यामुळे कास पुष्प पठार भकास करणार्याची अतिक्रमणे प्रशासन कधी हटवणार ? असा सवाल निसर्गप्रेमी करत आहेत.