देश/जग
‘हा’ आहे सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’
नवी दिल्ली :
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.
मानसामध्ये 29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारने घेतली होती. जो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी आहे. गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे.