सातारा
बेकायदेशीर हॉटेल्समुळे वेण्णा लेक रस्त्यावर पाणी
सातारा (महेश पवार) :
महाबळेश्वर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे , या पावसामुळे वेण्णा लेक ओव्हर फ्लो झाला असून नदी पात्रात पाण्याची आवक वाढली आहे.
नदी पात्रात अतीक्रमण करुन हॉटेल बांधल्याने नदी च्या पाण्याला फुगवटा येऊन नदीचं पाणी रस्त्यावरुन वाहू लागल्याने वाई महाबळेश्वर रस्त्यावरील वेण्णा लेक परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली जर पावसाचे प्रमाण कमी झाले नाही, तर वाहतूक देखील बंद होण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्स लोकांना पाण्यातून मार्ग काढून देत आहे आपलं मदतकार्य करत आहेत . मात्र महाबळेश्वर ची आपात्कालीन यंत्रणा सलाईनवर असल्याचे चित्र दिसत आहे . घटनास्थळी एकाही कर्मचारी नसून सर्व शासकीय आपात्कालीन यंत्रणा नावालाच आहेत काय अशी परिस्थिती सध्या तरी महाबळेश्वर येथे दिसत आहे .