गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्यावतीने कृत्रिम तळे
सातारा :
येथील नगरपरिषद कार्यालयामार्फत घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी गणेश विसर्जन कृत्रिम अवधानची सोय करण्यात आली आहे.
तसेच राजवाडा परिसरातील जुन्या मात्र सध्या वापरात नसलेल्या पोहण्याच्या तलावामध्ये नागरिकांसाठी गणेश विसर्जन सहजपणे करता यावे यासाठी हा तलाव सध्या स्वच्छ पाण्याने भरून तेथे विसर्जन व्यवस्थेसाठी मचाड बांधण्यात आले आहेत. या परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गौरी बरोबर होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी आता सोमवारी तसेच सातव्या दिवशी नव्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीला या परिसरात गर्दी होणार आहे पालिकेच्या वतीने निर्माल्य टाकू नये यासाठी परिसरात बाहेरील बाजूस निर्माल्य कलश स्थापन केले आहेत.
गौरी आल्या सोन्या रुप्याच्या पावलांनी :
आल्या आल्या गौरी कशाच्या पावलांनी, आल्या गौरी सोन्या रुप्याच्या , हिरे मोत्याच्या पावलांनी.. असे म्हणत घरोघरी आज ज्येष्ठ व कनिष्ठ गौरींचे आगमन झाले.
शनिवार ,रविवार आणि सोमवार आता घरोघरी या गौरीचे आगमन पूजन व विसर्जन असा सोहळा संपन्न होणार आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या बहिणी ज्येष्ठ व कनिष्ठ मानल्या जातात .या गौरींना सजवून घरोघरी शनिवारी आगमन करण्यात आले .रविवारी यांचा पूजन सोहळा तसेच महानैवेद्य दाखवण्यात येणार असून त्यानंतर सोमवारी सायंकाळी या गौरींचे विसर्जन केले जाते .अनेक घरगुती गणपतीचे ही गौरींबरोबर विसर्जन करण्याची प्रथा आहे.
आज अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर घरोघरी या गौरींचे पाणवट्यापासून तसेच परिसरातील तुळशी वृंदावन पासून घरोघरी महिलांनी वाजत गाजत आणि ..आल्या आल्या गौरी गौरी कशाच्या पावलांनी ..असे म्हणत आगमन कार्यक्रम संपन्न केला .त्यानंतर घरामध्ये या गौरींचे पूजन करून आरती करण्यात आली .आज अनेक घरी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जात असून उद्या महानैवेद्यामध्ये पुरणपोळी तसेच पाच पकवांना गोड पदार्थ नैवेद्यात दाखवण्याची प्रथा आहे.
आज या गौरीच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ खरेदीसाठी सातारा शहरातील मोती चौक ,राजवाडा , नाका परिसरात विविध मिठाई स्टॉलवर महिलांची विशेष गर्दी झाली होती .तसेच अनेक घरी गंगा गौरी म्हणजेच खड्यांच्या गौरी पाणवट्यावर आणून त्यांचे पूजन केले जाते या गौरीपुढे विविध रंगाची फुले ,पाने ,पत्री पूजेसाठी मांडले जातात. त्या खरेदीसाठीही आज सातारा शहरातील राजवाडा परिसरात विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती गौरीच्या सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे दागिने तसेच सजावट साहित्यांनी स्टॉल भरून गेले होते.