ग्रेड सेपरेटरमुळे साताऱ्यात महाविद्यालयीन तरुणाईचे जीव धोक्यात ?
शहरातील पोवई नाका म्हणजे आठ रस्ते एका ठिकाणी मिळणारे ठिकाण या ठिकाणी वाढत चाललेल्या ट्राफिक जामच्या समस्येला पर्याय म्हणून कोट्यवधी खर्च करून केलेल्या ग्रेड सेपरेटरमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी बस स्थानक, तहसीलदार कार्यालयापासून महाविद्यालया पर्यंत जाण्या-येण्यासाठी रस्ताच नसल्याने या ग्रेड सेपरेटर मधून जिव धोक्यात घालून ये जा करावी लागते . यामुळे जिल्हा प्रशासन ग्रेड सेपरेटर मध्ये एखादा अपघात होण्याची वाट बघतेय का ? असा सवाल संतप्त पालक वर्गामधून उपस्थीत केला जात आहे.
खरंतर बस स्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत फुटपाथ असताना देखील झालेल्या अतिक्रमणामुळे चालत रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांनाच जिव मुठीत धरून जावं लागतं . मात्र राजकीय उदासीनता सोडा तर राजाश्रय असल्याने लोकांचें जिव धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे