गोवा राज्यात आता 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रंगत वाढू लागली आहे. येत्या काही दिवसातच हा कार्यक्रम राजधानी पणजीत सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासन ही सतर्क झाले असून राजधानी पणजी तसेच आग्शी हद्दीमध्ये पोलिस प्रशासनाने नवे आदेश लागू केले आहेत. हे निर्बंध 19 नोव्हेंबर पासून ते 28 नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज पणजी पोलिसांनी कलम 144 लागू केले आहेत. याचा हेतू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यात आला असल्याचं पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.पुढील निर्बंध लागूपाच किंवा अधिक व्यक्तींची सभा आणि एकत्र येणे आणि मिरवणुका काढणे.लाठी, तलवारी, खंजीर किंवा भाले यासारख्या गुन्ह्यांसाठी बंदुक किंवा शस्त्रे बाळगण्यासाठी निर्बंध लागू असणार आहेतलाउडस्पीकरचा वापर करण्यास निर्बंध असतीलकोणत्याही कार्यक्रमांमध्ये घोषणाबाजीला निर्बंध लागू असतीलपणजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमा ठिकाणाभोवती तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीगत कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. मात्र लग्न, अंत्ययात्रा अथवा विशेष कार्यक्रम प्रसंगी हा आदेश लागू होणार नाही. मात्र इतर व्यक्तीगत कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहेत.