विजय दिवसाची विजय गाथा…१
– संभाजी मोहिते
कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमावर वसलेलं कराड हे शहर नाविन्याचा ध्यास घेतलेले कराड शहर तसेच इतिहासाचे ही जतन करण्यात तेवढेच अग्रेसर असणारे कराड शहर ही बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित झालेली आहे. शेती शिक्षण सहकार कला क्रीडा आरोग्य पर्यावरण राजकारण सर्वच आघाड्यांवर स्पर्धेत अग्रेसर असणारे शहर म्हणजे कराड.
याच नगरीत सन 1998 साली एका ध्येयवेढ्या सैनिकाने वेगळ्या उपक्रमाचा प्रारंभ केला. संदर्भ होता बांगला मुक्तिसंग्रामातील भारतीय सैन्य दलाचा विजय आणि ध्येय वेड्या जवानाचे नाव म्हणजेच कर्नल संभाजी पाटील. होय १९७१ च्या बांगला मुक्तिसंग्रामामध्ये मेजर या पदावर कार्यरत असताना संभाजी पाटील यांना प्रत्यक्ष रणांगणावर सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. शेनोली तालुका कराड येथे जन्मास आलेले संभाजी पाटील यांनी बालवयात स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक चित्तथरारक कथा त्यातील नायकांच्या तोंडून ऐकल्या होत्या. आता त्यांच्यावर वेळ आली होती अध्यक्ष रणांगणावरती शौर्य गाजवण्याची.
1971 च्या बांगला मुक्तिसंग्रामातील लढ्यामध्ये संभाजी पाटील यांच्या भीमपराक्रमाने शत्रु चारी मुंड्या चीत झालाच त्याहीपेक्षा ज्या शत्रुसैन्याला जेरबंद करण्यात यश आले होते त्यांनी सुद्धा पराक्रमाचे तोंड भरून गुणगान केले. असा प्रत्यक्ष पराक्रमाचा वारसा सोबत घेऊन संभाजी पाटील नियत कालावधीनंतर कर्नल या पदावरून निवृत्त झाले. मात्र देशसेवेची रक्तातील संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अन म्हणूनच 98 मध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या आजी-माजी सैनिक व काही कराडकर नागरिक यांना सोबत घेऊन विजय दिवस समारोह समितीची केली गेली 16 डिसेंबर 1998 रोजी शिवाजी स्टेडियम कराड येथे एनसीसी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन युद्ध प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या एका घटनेने विजय दिवसाचे रोप कराड येथे रुजले.
संपूर्ण भारत वर्षामध्ये सातारा जिल्हा हा यांचा जिल्हा म्हणून अभिमानाने ओळखला जातो हा संदर्भ आजचा नसून इतिहास काळापासून तो आज अखेर नावाने आहे या मातीत जन्मास येणारे हजारो जवान दरवर्षी भारतीय सैन्य दलात ताठ मानेने सहभागी होतात प्रशिक्षण घेतात प्रसंगी प्राणाची आहुती देऊन देशाच्या रक्षणाचे काम चौख व पराक्रमपूर्वक पार पाडतात.
इतकी ओळख असे नाही विशेषतः आणि परिसरामध्ये नाऱ्या सुविधा युवाशक्ती नजर होऊ शकले भारतीय सैन्य दलातील जवानांच्या बरोबरीने युवक युवती कधीही कार्यरत होऊ शकतात आहे ती त्यांच्यावर वेगळे संस्कार करण्याची आणि भारतीय सैन्य दलाशी जवळीक जिव्हाळा स्नेहबंध निर्माण करण्याची याच विचारातून विजय दिवस जन्मास आला. (क्रमशः)