सातारा (महेश पवार) :
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर अनेक हॉटेल्समध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी डिजे, लेझर शो चे आयोजन करण्यात आले आहे. खर तर कास पठार हे सुरुवातीला फुलांसाठी प्रसिद्ध झाले, पण आता या कास पठाराची ओळख ही हॉटेल पठार अशी होऊ लागली. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून याठिकाणी राजरोसपणे जंगल नष्ट करून बांधकाम उभी राहिली आणि उभी रहात आहेत. परंतु प्रशासन आणि राजकीय वरदहस्ताने हे सगळं सुरू असल्याने यावर कारवाई कोण करणार प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष बाब म्हणजे सातारा कास रस्त्यावर झालेल्या हॉटेलमध्ये मद्य पी चा रोजच धांगडधिंगाना असतो मात्र इंग्रजी नव वर्षाच्या स्वागतासाठी याठिकाणी डिजे तालावर डान्स आणि लेझरशोचे आयोजन अनेक हॉटेल धारकांनी केलं यामुळे कास पठार परिसरात होणा-या ३१ डिसेंबरच्या धांगडधिंग्याचे सातारा पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे .
कास पठार परिसरात फिरायला कमी आणि दारू पिऊन धांगडधिंगा घालणाऱ्यांची संख्या जास्त आहे , मात्र कास पठार मार्गावर असणारी चेक पोस्ट नावालाच राहिली असून, याठिकाणी बेकायदेशीर रित्या उभ्या राहिलेल्या हॉटेल मध्ये परवानगी नसताना काही ठिकाणी दारु विक्री देखील केली जाते तर काही हॉटेल्स मध्ये देह विक्री चा व्यवसाय चालत असल्याचीही घटना समोर आली यामुळे भविष्यात कास पठाराची जागतिक हॉटेल्स च वारसा स्थळ म्हणून ओळखले जाईल .