सातारा
राजूभैया म्हणजे विकासाचे पर्व : शिवेंद्रसिंहराजे भोसले
सातारा (महेश पवार) :
सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील एका छोट्याशा गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजू भैय्या भोसले यांनी आपल्या कामांच्या जोरावर राजकीय सामाजिक जीवनात चांगले काम करत आपला ठसा उमटवला असून परळी विभागातील अनेक कामं मार्गी लावून परळी खोऱ्यात विकासाचे पर्व उभं केलं . आणि स्व संपतराव भोसले याचा वारसा सक्षमपणे चालवला आहे . आमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणाऱ्या राजू भैय्या व संतोष दादा यांच्या कुटुंबासमवेत आम्ही कायम आहोत अशी ग्वाही आमदार शिवेंद्रराजे यांनी राजू भैया भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान दिली.
राजू भैया भोसले यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला , वाढदिवसाच्या निमित्ताने राजू भैय्या भोसले यांना जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या , तर आरे दरे येथे घेण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत १९२ गाड्यांनी सहभाग नोंदविला तर ही शर्यत पाहण्यासाठी हजारो बैलगाडा शर्यत प्रेमीची उपस्थिती पहायला मिळाली .आंबवडे येथे कुस्त्यांचा जंगी मैदान कचाकच भरलेलं होतं , यामुळे परळी खोऱ्यात राजू भैय्या भोसले यांचा वाढदिवस म्हणजे एक प्रकारची पर्वणीच समजली जाते .
राजू भैय्या भोसले यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने काढण्यात आलेली दुचाकी रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर रॅलीच्या दरम्यान ठिकठिकाणी राजू भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यांवर अलोट गर्दी पाहिला मिळाली.