डॉ. दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण; 91 जणांना पद्मश्री
नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (25 जानेवारी) पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 2023 साठी, राष्ट्रपतींनी 106 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. या यादीत 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्रींचा समावेश आहे. 19 पुरस्कार विजेत्या महिला आहेत. समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला आहे.
दुसरीकडे, बाळकृष्ण दोसी आणि पश्चिम बंगालचे प्रसिध्द डॉ. दिलीप महालानबीस यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओआरएसच्या शोधासाठी डॉ. दिलीप महालनाबीस यांना हा सन्मान देण्यात आला आहे. याशिवाय, संगीतकार झाकीर हुसेन, एसएम कृष्णा, श्रीनिवास वर्धन यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.
तसेच, दिमा हासाओ येथील नागा समाजसेवक रामकुईवांगबे न्यूमे, ज्यांनी हेराका धर्माचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, त्यांना सामाजिक कार्य (संस्कृती) क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुधा मूर्ती, कुमार मंगलम बिर्ला यांचा पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर), RRR चित्रपट संगीतकार एमएम कीरावानी, अभिनेत्री रवीना रवी टंडन यांचा 91 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
तेलंगणातील 80 वर्षीय भाषाशास्त्राचे प्राध्यापक बी. रामकृष्ण रेड्डी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कांकेर येथील गोंड ट्राइबल वुड कार्व्हर अजय कुमार मांडवी यांना कला (लाकूड कोरीव काम) क्षेत्रात पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. ऐजॉलचे मिझो लोकगायक के.सी. रणरेमसांगी यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात येणार आहे. जलपाईगुडी येथील 102 वर्षीय सरिंदा उस्ताद मंगला कांती रॉय यांना कला (लोकसंगीत) क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.