google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

राजेंद्र आर्लेकरांनी घेतली बिहारचे राज्यपाल म्हणून शपथ

New Bihar Governor: बिहारचे नवे राज्यपाल म्हणून राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी शुक्रवारी शपथ घेतली. ते बिहारचे 41 वे राज्यपाल आहेत. त्यांनी राज्यपालपदाचा पदभार स्वीकारला आहे. पाटणा उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश चक्रधारी शरण सिंह यांनी दुपारी 12.30 वाजता राजभवनात झालेल्या समारंभात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह इतर मंत्री विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

बिहारचे नवे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर शुक्रवारी सकाळीच पाटणा विमानतळावर पोहोचले. पाटणा विमानतळावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

गुरुवारी हिमाचलमध्ये त्यांचा निरोप समारंभ होता. याआधी बिहारचे राज्यपाल असलेले फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. फागू चौहान यांनी बिहारमध्ये साडेतीन वर्षे काढली.

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे 2002 ते 2007 पर्यंत आमदार होते. 2012 ते 2015 या काळात ते गोवा विधानसभेचे अध्यक्षही होते. ऑक्टोबर 2015 ते 2017 पर्यंत त्यांनी गोव्याच्या वन पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ते गोव्याचे पंचायत राज्यमंत्रीही होते. यानंतर त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आले.

मूळचे गोव्याचे असलेले राजेंद्र आर्लेकर यांचा जन्म २३ एप्रिल १९५४ रोजी पणजी येथे झाला. आर्लेकर यांनी 1989 मध्ये वयाच्या 35 व्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये जेव्हा मनोहर पर्रीकर यांची केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा गोव्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून आर्लेकर यांचीच चर्चा होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!