गोव्यातील पणजी आणि वास्को या शहरांना जोडणारा राष्ट्रीय जलमार्ग – 68 तयार झाल्याने पणजी आणि वास्को या शहरांतील अंतर 9 किमी ने कमी झाले आणि आता हा प्रवास केवळ 20 मिनिटांत पूर्ण करत येतो, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. पूर्वी पणजी ते वास्को अंतर जवळपास 32 किमी होते आणि त्यासाठी 45 मिनिटे एवढा वेळ लागत होता.
केंद्रीय बंदरे, जहाज उद्योग आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले, पणजी आणि वास्को दरम्यान या नव्या मार्गामुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे तसेच, यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
पंजिम से वास्को के बीच इस कनेक्टिविटी से लोगों को राहत मिलने के साथ-साथ पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा। https://t.co/poBGPk2cN8
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2023
“पणजी ते वास्को दरम्यानच्या या दळणवळण व्यवस्थेमुळे लोकांची सोय होईलच, शिवाय पर्यटनालाही चालना मिळेल.”