google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

मुख्यमंत्र्यांच्या होम पिचवर त्यांच्याच माजी नगरसेवकांचा अंदाधुंद गोळीबार , दोघांचा मृत्यू

सातारा (महेश पवार) :

जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा विभागात रविवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली . मदन कदम असं गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कट्टर समर्थक व माजी नगरसेवक असून, त्याने केलेल्या गोळीबारात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान सातारा पोलीसांनी घटनास्थळावरून हल्लेखोर मदन कदम याला ताब्यात घेतले असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हल्लेखोर मदन कदम याने परिसरात अंदाधुंद गोळीबार करत दहशत माजवली यावेळी मदन कदम याने आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्यामुळे या परिसरात तणावाचे व भिंतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे समजते. ठाणे शहरातील माजी नगरसेवक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे व्यक्ती म्हणून मदन कदम यांची ओळख असल्याचे बोलले जात असून मदन कदम यांच्यावर काही वर्षांपूर्वी गुजरात बॉर्डर वर बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटकेची कारवाई देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर येत असून आता पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!