कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची यशाची परपंरा कायम…
सातारा (महेश पवार) :
भुईंज ता. वाई येथिल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी NMMS या परीक्षेत विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच ५५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृती मिळऊन विद्यालयची शान वाढवीत नावलौकिक मिळवला. यामध्ये रिया नारद चौधरी, वसानिया प्रदिप माने या विद्यार्थीनीं राष्ट्रीय शिष्यवृती मिळवली आहे.तर उरलेले ५३ विद्यार्थी सारथी चे शिष्यवृतीधारक ठरले आहेत.
या सर्व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आगलावे मँडम,चव्हाण मँडम,सांळुखे सर,विभागप्रमुख चित्रा भोज या सर्वच शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डाँ.अनिल पाटील,व्हाईस चेअरमन शिंदे,मध्य विभागाचे चेअरमन संजीवकुमार पाटील,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव-इनामदार, स्थानिक स्कुल कमीटीचे मान्यवर,विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधवसर,पर्यवेक्षिका साळुंखे मँडम,गुरुकुल प्रमुख उपेंद्र घाडगेसर,साळुखेसर,महेश भोईटेसर,यांनी कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर काँलेज भुईंज या शाळेतुन अनेक विद्यार्थी घडले आणि अनेक विद्यार्थी- विद्यार्थीनीनी शाळेचा नावलौकिक वाढवीत रयत शिक्षण संस्थेत या शाळेने एक मानाचा तुरा रोवला असुन रयत चे सर्व पदाधीकारी,श्रीमंत भैय्यासाहेब जाधवराव-इनामदार, व भुईंज विद्यालयाचा सर्व शिक्षक यांचा यामध्ये सिंहाचा वाटा असुन या सर्वचजनांचे शैक्षणिक क्षेत्रासह विवीध क्षेत्रातुन आभिनंदन होत आहे.