‘मुंबई-गोवा महामार्गावरील सिंगल लेनचे काम गणपतीपुर्वी पूर्ण करा’
मुंबई:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणपतीपूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण करा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
आज, मंगळवारी गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक घेतली.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील सिंगल लेनचे काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीनंतर चव्हाण बोलत होते.
मंत्री चव्हाण म्हणाले की, सुरवातीचा पनवेल-इंदापूर हा ४२ किलोमीटरचा रस्ता सिंगल लेन काँक्रिट रस्ता पावसाळ्यापुर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधीपर्यंत पुर्ण होणार याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यापुर्वीच डेडलाईन दिली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे गडकरी यांनी यापुर्वीच सांगितले आहे.