स्वातंत्र्यसैनीक व माजी मुख्याध्यापक दामोदर कवळेकर अनंतात विलीन
मडगाव :
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनीक व मॉडेल इंग्लिश हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक व पत्रकार दामोदर कवळेकर यांच्या पार्थीवावर आज संध्याकाळी मठग्रामस्थ हिंदूसभेच्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र परेश याने चितेस मंत्राग्नी दिला.
यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी नगराध्यक्ष घनशाम शिरोडकर व सावियो कुतिन्हो, पत्रकार अजित पैगीणकर व अनिल पै, साईश पाणंदिकर, डॉ. विशाल गुडे, उल्हास गायतोंडे, एकनाथ नायक, विशाल पै काकोडे, अविनाश शिरोडकर, गुरूदत्त पंडित, सुशांत भांडारी, अतुल वेर्लेकर, तसेच दामोदर कवळेकर यांचे कुटुंबिय हजर होते.
काल संध्याकाळी दामोदर कवळेकर यांची प्राणज्योत मालवील्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे सहकारी शिक्षक, विद्यार्थी तसेच हितचींतकांची त्यांच्या घरी रिघ लागली होती.
त्यांचे माजी विद्यार्थी फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, शिक्षक नॅटी डिसोजा, स्मिता वेरेकर, मनिषा धूमे, रेवती पै काणे, सुनंदा नाडकर्णी, मंजूळा केणी, राजेश भाटीकर, रती भाटीकर, तसेच त्यांचे विद्यार्थी मोहनदास लोलयेकर, प्रशांत नाईक, सुहास सडेकर, गुरूनाथ आमोणकर, राजेंद्र नार्वेकर, दत्ता आमोणकर, आनंद सांवत, संतोष सावंत व इतरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्यी पार्थिवाचे दर्शन घेतले.
दामोदर कवळेकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एका पर्वाचा अस्त झाल्याची भावना त्यांचे शिक्षक व विद्यार्थ्यानी व्यक्त केली.