google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘सोशल मिडियावर गोव्याची बदनामी केल्यास होणार कारवाई’

सोशल मिडियाच्या माध्यमातून गोव्याची बदनामी केल्यास आता त्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पावसाळी अधिवेशानाच्या अकराव्या दिवशी सभागृहात दिली. वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी शून्य कालमध्ये याबाबत प्रश्न विचारला, त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.

आमदार दाजी साळकर यांनी Instagram Reels मधून गोव्याची बदनामी केली जात असल्याची माहिती सभागृहात केली. इन्स्टाग्रावर एकाने पणजीतील प्रसिद्ध इमॅक्युलेट चर्चची बदनामी केल्याचे सांगितले.
याबाबत सक्त कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी साळकर यांनी सभागृहात केली. राज्यात येणाऱ्या पर्यटकांचे आम्ही स्वागत करतो पण, अशा पद्धतीने बदनामी करणाऱ्या व्यक्तीचे अकाऊंट ब्लॉक केले जावे असेही साळकर म्हणाले.

 

दरम्यान, याबाबत उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी सायबर विभागाला याबाबत सूचना देऊन कारवाई करण्यास सांगितले असे आश्वासन सभागृहाला दिले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात गोवा म्हणजे दारू, बिकिनी असे चित्र रंगवणाऱ्या सोशल मिडियावरील एका कथित इन्फ्लुएंसर तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला एका गोंयकाराने व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय देखील देण्यात आला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!