हनी ट्रॅप प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नियुक्ती
गोवा पोलिसांनी हनी ट्रॅपच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे.
या 12 सदस्यीय पथकाचे नेतृत्व उपमहानिरीक्षक अस्लम खान, क्राईम ब्रांच पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन, वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्याकडे देण्यात आले असून कळंगुट व कोलवाळ पोलिसांत नोंदवण्यात आलेली हनी ट्रॅपच्या दोन प्रकरणांचा तपास हे पथक करण्यात आले आहे.
12 सदस्यीय विशेष चौकशी पथकात पोलीस अधीक्षक सुनिता सावंत, उपअधीक्षक सुदेश नाईक, निरीक्षक राहुल परब, जॉन फर्नांडिस, सतीश पडवळकर, रीमा नाईक, उपनिरीक्षक सोनम वेरेकर, प्रगती मळीक व दोन कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
डेटला जाऊन पुरुषांना तक्रार करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणे अश्या कळंगुट व कोलवाळ पोलिसांत नोंदवलेल्या गुन्ह्यांचा तपास एसआयटी पथक करणार आहे.
विमान प्रवासावेळी संशयितासोबत ओळख झाली व हॉटेलवर बोलावून आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार संशयित गुजराती युवतीने कोलवाळ पोलिसांत दाखल केला होती. त्यानुसार संशयित लक्ष्मणभाई शियार (४५, रा. गुजरात) यास पोलिसांनी अटक केली होती.
मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासत ही युवती पुरुषांसोबत डेटला जावून पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देत खंडणी वसूल करत असल्याचे समोर आले.
तर दुसरे प्रकरण, हे कळंगुट पोलिसांत दाखल झाले होते. या प्रकरणात डेटींग अॅपमार्फत पुरुषांशी संपर्क साधून मोबाईलवर चॅटींग करुन ब्लॅकमेल करणे तसेच खंडणी मागणे. पैसे न दिल्यास पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवण्याची धमकी युवती देत होती.
एका गुजरात येथील फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर 23 वर्षीय दोन युवतींसह एका युवकाला अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणांची चौकशी एसआयटी करणार आहे.