5 वी बाल साहित्य परिषद 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी मडगावात
कोंकणी भाषा मंडळातर्फे आयोजित 5 वी बाल साहित्य परिषद 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे होणार आहे. ही परिषद दोन्ही दिवशी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत चालेल. गोव्यातील बालसाहित्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि मुलांमध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने ही परिषद एक मोठे पाऊल आहे. परिषदेची तयारी जोरात सुरू असून बालसाहित्य क्षेत्रात काम करणारे भारतातील सर्वोत्कृष्ट वक्ते आणि लेखक ह्यात सहभागी होऊन आपले विचार मांडतील.
आजची मुलं हे आपल्या देशाचं भविष्य आहेत हे आपण समजतो. आजच्या मुलांनी वाचनाची सवय लावली पाहिजे आणि त्यांना साहित्य आणि पुस्तकांची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे आजच्या घडीला पुस्तक आणि इतर वाचन साहित्य प्रकाशित करून विकसित करण्याचीही गरज आहे. या उद्देशाने कोंकणी भाषा मंडळ, गोवा 2017 पासून बालसाहित्य परिषद आयोजित करत आहे. आज पर्यंत, 1,000 हून अधिक शिक्षक, लेखक, चित्रकार आणि साहित्यप्रेमींनी त्याचा लाभ घेतला.
संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक, लेखक, वाचक आणि बालसाहित्य प्रेमींना गुगल फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकां कडून करण्यात येत आहे.