सातारा
वाईत शरद पवार देणार प्रतापराव भोसलेंच्या नातवाला संधी…?
सातारा (महेश पवार)
शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी राज्यांत आणि सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून बघितलं जातो. वाई खरंतर शरद पवारांनी सत्तेत असताना आणि नसतानाही ज्यांना बरोबर घेऊन काम केले आणि पवारांचा हुकमी एक्का म्हणून बघितलं जायचं ते दिवंगत खासदार लक्ष्मण पाटील यांच्याकडे. त्यांच्यामुळेच शरद पवारांनी मकरंद पाटील यांना संधी दिली आणि वाईतुन तब्बल तीन वेळा निवडून आणले. पण मध्यंतरीच्या काळात अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजप आणि शिंदेसेनेसोबत गेले. त्यावेळी मकरंद पाटील देखील अजित पवार यांच्याबाजूला झुकले.
यामुळे शरद पवारांनी देखील वाईतून नवा गडी शोधण्याचं कामं सुरू केले असून सध्या ते चाचपणी करत आहेत. यांतच दिवंगत खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची वाई खंडाळा महाबळेश्वर येथील प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत भेट घेतली. यामुळे वाई तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून यामुळे शरद पवार आता प्रतापराव भोसले यांच्या नातवाला संधी देऊन नवी खेळी करत आहेत ते पाहावे लागणार आहे.