अर्थमत/ टेक्नॉलॉजीगोवा
ला एस्टोरीया, गोवा : आयएचसीएल सिलेक्शन्स पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज
मुंबई :
भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने ला एस्टोरीया, गोवा – आयएचसीएल सिलेक्शन्सचा शुभारंभ झाल्याची घोषणा केली आहे. किनारपट्टीवर वसलेल्या, निसर्गरम्य कँडोलिम गावामध्ये सुरु करण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये गोवन-पोर्तुगीज डिझाईन आणि आधुनिक शान यांचा अतुलनीय मिलाप साधण्यात आला आहे.
आयएचसीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री पुनीत छटवाल यांनी सांगितले, “गोव्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये लक्षणीय वृद्धी घडून येत आहे. आयएचसीएल गेली पाच दशके गोव्यामध्ये पर्यटकांचे आदरातिथ्य करत आहे आणि सातत्याने व्यवसाय विस्तार करत आहे. विशेष अनुभव मिळवण्यासाठी प्रवास करण्याचा ट्रेंड वाढत आहे, त्याला साजेसे ला एस्टोरीया, गोवा – आयएचसीएल सिलेक्शन्स सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतामध्ये पर्यटकांचे सर्वात आवडीचे ठिकाण असलेल्या गोव्यामध्ये आगळेवेगळे, सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवणारे अनुभव याठिकाणी प्रदान केले जातील.”
ला एस्टोरीया म्हणजे गोष्ट, गोव्याचा वैभवशाली इतिहास आणि आधुनिक शान यांची गोष्ट अनुभवायची असेल तर इथे नक्की या. कँडोलिम बीचपासून सहज चालत जाण्याइतक्या अंतरावर असलेले, १२२ खोल्यांचे हे रिसॉर्ट आपल्या वास्तुकलेतून गोव्याची सांस्कृतिक वीण दर्शवते. प्रत्येक खोलीला बाल्कनी देण्यात आलेली असल्याने समुद्रकिनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्याचा मनोसोक्त आस्वाद घेता येईल.
१९८१ पासून अस्सल इटालियन पक्वानांसाठी नावाजल्या जाणाऱ्या ट्राटोरियामध्ये पाककलेचा अविस्मरणीय आनंद मिळवता येईल, कंटेर्बरी बारमध्ये आरामात बसून, गोव्याच्या गतकाळातील सौंदर्याचा अनुभव घेता येईल. भरपूर नैसर्गिक प्रकाश असलेले आधुनिक जिम इथे आहे, वाऱ्यावर हेलकावे घेणाऱ्या पाम झाडांनी घेरलेला ओपन स्विमिंग पूल आणि रिट्रीटचा अनुभव देणारा स्पा अशा अनेक सुविधा याठिकाणी सज्ज आहेत.

ला एस्टोरीया, गोवा – आयएचसीएल सिलेक्शन्सचे जनरल मॅनेजर श्री अंकुर गैरोला यांनी सांगितले, “अतिशय अनोखे गोवन-पोर्तुगीज सौंदर्य दर्शवण्यासाठी, पाहुण्यांना अनोखी गोवन संस्कृती आणि गोव्याचे आकर्षक सौंदर्य दाखवण्यासाठी ला एस्टोरीया डिझाईन करण्यात आले आहे. आम्ही ज्यासाठी नावाजले जातो ती अतिशय आपुलकीने केली जाणारी देखभाल अनुभवण्यासाठी इथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील टुमदार गाव कँडोलिम गोव्याच्या सौंदर्याचा आरसा आहे. निवांत आयुष्यासाठी ओळखले जाणारे कँडोलिम म्हणजे साहस, आराम आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये हे सर्व हवे असणाऱ्यांसाठी आवडीचे डेस्टिनेशन आहे.
आता गोव्यामध्ये आयएचसीएलची १६ हॉटेल्स झाली आहेत आणि त्यापैकी ४ हॉटेल्सचे बांधकाम सुरु आहे.
आता गोव्यामध्ये आयएचसीएलची १६ हॉटेल्स झाली आहेत आणि त्यापैकी ४ हॉटेल्सचे बांधकाम सुरु आहे.