google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

20, 21 रोजी फोंड्यात होणार ज्ञान’परिक्रमा 0.6′

पणजी:
सम्राट क्लब खांडोळा व बेतकी खांडोळा पंचायतीच्या सहकार्याने शनिवार दि. २० रोजी व रविवार दि. २१ रोजी खांडोळा महाविद्यालयाजवळ परिक्रमा ०.६चे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रांगण प्रियोळ मतदारसंघाचे माजी आमदार कायदेतज्ज्ञ डॉ. काशिनाथ जल्मी महाशाला या नावाने समर्पित करण्यात आले आहे, अशी माहिती परिक्रमा ०.६चे अध्यक्ष युगांक नायक यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बेतकी खांडोळा पंचायतीचे सरपंच बिशांत नाईक, परिक्रमा ०.६चे क्यूरेटर जितेंद्र शिकेरकर, सम्राट क्लब खांडोळाचे अध्यक्ष निखिल साळगावकर, परिक्रमा ०६चे संघटन सचिव विनीत कुंडईकर उपस्थित होते.

सदर स्पर्धेत एकूण २५ संस्था आणि ३००० युवा सहभागी होणार आहेत. परिक्रमाची सहावी आवृत्ती असून गोव्यातील मोठा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. परिक्रमा ०.६मध्ये ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑनसाईट पद्धतीने ३०हून जास्त स्पर्धाचा समावेश आहे.

सदर महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. २० रोजी सकाळी १०.३० वा. होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईक, खांडोळा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पूर्णकला सामंत व इतर मान्यवर उपस्थित असतील. अशी माहिती युगांक नायक यांनी दिली.

परिक्रमा ०.६ ही स्पर्धा विविध भागात आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय बॉक्स थिएटर ही नवीन संकल्पना सुरू करण्यात येणार असून यात कथांचे नाट्यरूपांतर करण्यात येणार आहे. या बॉक्स थिएटर नाट्यकर्मी विजयकुमार नाईक यांच्या नावे समर्पित करण्यात येणार आहे. खेलो गोवा यातून गोव्यातील पारंपारिक खेळ लोकप्रिय करण्यात येतील तसेच या विभागातील १० खेळांचे स्पर्धाही होतील, पेटिंग्स आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित करण्यात येतील. परिक्रमा ० • ६मध्ये पहिल्यांदाच परिक्रमा गोल्ड स्टैंडर्ड या नावाने चषकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विष्णू सूर्या वाघ यांच्या कुटुंबियांतर्फे आणि हितचिंतकातर्फे हे चषक प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय क्रिकेटर युवराज सिंह यांच्या युवी कॅन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्तन कर्करोग तपासणी आणि बोन डेन्सीटी टेस्ट ही दोन शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. एकूण ५०० तपासणी या शिबिरातून करण्यात येणार आहेत.

याचबरोबर दरवर्षी डॉ. माधवी सरदेसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युवा शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार फादर आग्नेल महाविद्यालयाच्या शिक्षिका बिंदीया गावस यांना जाहीर करण्यात आला आहे. एकनाथ सूर्या नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गौरीश फोंडेकर यांना कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी परिक्रमा नॉलेज टर्मिनस या थिंक टॅन्क यातून ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांना फेलोशिप दिली जाते. यंदा विद्याप्रबोधिनीचे प्राचार्य भूषण भावे आणि डॉ. चित्रलेखा नाईक यांना फेलोशिप देण्यात येणार आहे.
याशिवाय हवामान बदल या विषयावर मासिकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती युगांक यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!