google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

आदित्य बिर्ला ग्रुपने दागिने उद्योगक्षेत्रात केली ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी ग्रुपने दागिने रिटेल व्यवसाय सुरु केल्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे आदित्य बिर्ला ग्रुपने वेगाने विस्तार पावत असलेल्या ६.७ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या भारतीय दागिने बाजारपेठेत पदार्पण केले आहे. प्रभावी ब्रँड इक्विटी व बाजारपेठेविषयीची सखोल समज यांच्या बळावर, ग्राहकांना प्रस्तुत केल्या जात असलेल्या पोर्टफोलिओला मजबूत करण्याच्या वाटचालीतील हे धोरणात्मक पाऊल आदित्य बिर्ला ग्रुपसाठी अजून एक लक्षणीय टप्पा आहे.

‘इंद्रिय’ या ब्रँडअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या दागिने व्यवसायाला पुढील पाच वर्षात भारतातील सर्वात मोठ्या तीन दागिने रिटेलर्समध्ये स्थान मिळवून देण्याचे ग्रुपचे लक्ष्य आहे. या महत्त्वाकांक्षी व्हेन्चरसाठी तब्बल ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, भारतातील दागिने रिटेल क्षेत्रात नवक्रांती घडवून आणण्याचा आदित्य बिर्ला ग्रुपने केलेला निर्धार यामधून ठळकपणे दिसून येत आहे.

या लॉन्च प्रसंगी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले, “भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी, मागण्यांमध्ये लक्षणीय वाढ आणि सुधारणा होत आहेत. आज भारत ही जगातील सर्वाधिक आशादायी बाजारपेठ असावी. यंदाच्या वर्षी पेंट्स आणि दागिने या उद्योगक्षेत्रांमध्ये दोन नवे, मोठे ब्रँड्स आणून भारतीय ग्राहकांच्या क्षमतांवरील आमचा विश्वास दुपटीने वाढवला आहे. अनौपचारिक ते औपचारिक क्षेत्रांमध्ये होत असलेले मूल्य स्थलांतरण, मजबूत, विश्वसनीय ब्रँड्सकडे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि लग्नासाठीच्या खरेदीच्या बाजारपेठेतील प्रचंड तेजी या सर्व लक्षणीय वृद्धी संधी प्रस्तुत करणाऱ्या बाबींमुळे दागिने उद्योगक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी खूपच स्वाभाविक होते.” ते पुढे म्हणाले, “फॅशन रिटेल आणि लाईफस्टाईल उद्योगक्षेत्रात गेल्या वीस वर्षांहून जास्त काळापासून आघाडीवर असलेल्या आमच्या ग्रुपसाठी दागिने उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवून विस्तार करणे खूपच सोपे आहे. रिटेल, डिझाईन आणि ब्रँड व्यवस्थापनामध्ये आम्ही ज्या प्रचंड क्षमता आत्मसात केल्या आहेत त्या आमच्या यशाचे आधारस्तंभ बनतील.”

‘इंद्रिय’ ब्रँड एकाचवेळी दिल्ली, इंदोर आणि जयपूर या तीन शहरांमध्ये चार दुकाने सुरु करेल. पुढील सहा महिन्यांमध्ये १० पेक्षा जास्त शहरांमध्ये विस्तार करण्याची ब्रँडची योजना आहे. तब्बल ७००० चौरस फुटांहून प्रशस्त म्हणजे राष्ट्रीय ब्रँड्सच्या सरासरी आकारापेक्षा ३०% ते ३५% मोठी स्टोर्स असतील आणि त्यामध्ये सर्व प्रसंगांना साजेशा, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची विशाल श्रेणी प्रस्तुत केली जाईल. ५००० पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह डिझाईन्ससह १५००० वेगवेगळे दागिने सुरुवातीला उपलब्ध करवून दिले जाणार आहेत. दर ४५ दिवसांनी नवीन कलेक्शन्स सादर केली जातील. भारतीय फाईन ज्वेलरी मार्केटमधील हे सर्वात वेगवान माईंड टू मार्केट सायकल असणार आहे.

नॉवेल ज्वेल्सचे डायरेक्टर दिलीप गौर म्हणाले, “सर्जनशीलता, पुढे वृद्धिंगत होण्याची क्षमता, तंत्रज्ञान आणि दागिने क्षेत्रातील ग्राहकांना प्रदान केला जाणारा अनुभव यातील मानकांची नवी व्याख्या रचण्यासाठी आम्ही इंद्रियमध्ये सज्ज आहोत. प्रत्येक दागिन्यामागे कारिगरीची अनोखी कहाणी असते अशी आमची ठाम समजूत आहे आणि त्याच पायावर हा ब्रँड उभारलेला आहे. अनोखे उत्पादन, अतुलनीय ग्राहक अनुभव आणि एका आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारा खरेदीचा अनुभव या सर्वांमुळे दागिन्यांमधून स्वयं-अभिव्यक्ती करता येणे सहजशक्य होते. आमच्या प्रत्येक उत्पादनामध्ये कालातीत कारिगरी दिसून येते, आधुनिक डिझाईन्सना नवे रूप यामध्ये देण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी आम्ही तयार केलेले दागिने त्या क्षेत्राची अनोखी वैशिष्ट्ये दर्शवतात, वेगवेगळ्या संस्कृतींना आम्ही यामध्ये सामावून घेतले आहे.”

नॉवेल ज्वेल्सचे सीईओ संदीप कोहली यांनी सांगितले, “दागिने म्हणजे केवळ गुंतवणूक नाही तर स्टेटमेंट बनले आहेत. सहज कळून येईल असे वेगळेपण, अनोखी डिझाईन्स, व्यक्तिगत सेवा आणि अस्सल क्षेत्रीय ओळख हे आमच्या प्रत्येक प्रस्तुतीचे आधार आहेत. एक्सक्लुसिव्ह लाऊंजेससह नाविन्यपूर्ण सिग्नेचर अनुभव ही ‘इंद्रिय’ची खासियत आहे. स्टोरमध्ये उपस्थित असलेले स्टायलिस्ट्स आणि तज्ञ ज्वेलरी कन्सल्टन्ट यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या कस्टमायजेशन सेवांमुळे पंचेंद्रिये सुखावणारा आणि अतुलनीय खरेदीचे समाधान देणारा अनुभव मिळेल. आमचे या श्रेणीतील सर्वोत्तम डिजिटल फ्रंट एन्ड सर्व डिजिटल व फिजिकल टचपॉईंट्सना सहजसोपा अनुभव मिळवून देईल व त्यामुळे ज्वेलरी रिटेलमध्ये नवयुग अवतरेल.”

‘इंद्रिय’ हे या ब्रँडचे नाव संस्कृत भाषेतून घेण्यात आले आहे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेशी त्याचा खूप जवळचा संबंध आहे. ‘इंद्रिय’ हे नाव पंचेंद्रियांचे महत्त्व दर्शवते. पंचेंद्रियांना सुखावतील, ‘स्व’तःसाठी तयार करण्यात आले आहेत असे दागिने निर्माण करण्याचा ब्रँडचा सिद्धांत या नावातून दिसून येतो. ‘इंद्रिय’ चा ब्रँड लोगो, एक सुंदरशी हरिणी आहे, जी महिलेचे सौंदर्य व शान दर्शवण्याबरोबरीनेच इंद्रियांचे प्रभावी रूपक देखील आहे. फक्त अलंकारणापुरते नाही तर सक्षम व सन्मानित करणारे दागिने निर्माण करण्याची ब्रँडची वचनबद्धता यामधून अधोरेखित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!