google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

देशातील ‘या’ किनारी राज्यांकडे परदेशी पर्यटकांचा ओढा अधिक

पणजी:

प्रवासावरील निर्बंध आता शिथिल झाल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर भारताला भेट देण्यास उत्सुक असल्याचे, एअरबीएनबीच्या सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शिवाय पर्यटकांना इथे अधिक काळ रहायचं आहे आणि अधिक ठिकाणं पहायची आहेत. या पर्यटन क्रांतीतून स्थानिकांसाठी नव्या आर्थिक संधीही निर्माण होत आहेत.

आपल्या देशाने आता पर्यटनावरील सर्व निर्बंध शिथिल केल्याने भारतात येण्यास उत्सुक आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. भारतातील एअरबीएनबी स्टेचा आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी घेतलेला शोध २०२१ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ६० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. 1 देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा सावरण्यात पर्यटन क्षेत्र मोठा हातभार लावत असल्याचे यातून स्पष्ट होते. शिवाय, भारतात ‘लिव्ह एनीव्हेअर’ दूरस्थ कामकाज पद्धतीचे (रिमोट वर्किंग) लाभ अगदी सहज घेता येतात आणि देशात डिजिटल विश्वाची व्याप्तीही वाढत आहे. त्यामुळे एअरबीएनबीवर दीर्घकाळाचे वास्तव्य2 हा पर्याय पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. यूगव्ह (YouGov) तर्फे करण्यात आलेल्या एअरबीएनबी सर्वेक्षणानुसार, ८७ टक्के भारतीय काम करताना प्रवास, फिरणे किंवा इतर ठिकाणी जाऊन राहणे, अशा योजनांचा विचार करत आहेत.

एअरबीएनबीच्या आकडेवारीतून हेसुद्धा स्पष्ट झाले की सध्या ‘रिव्हेंज ट्रॅव्हल’ची चलती आहे. म्हणजेच, नेहमीच्या जगण्यातून काही वेगळे करण्यासाठी पर्यटक शहरी आयुष्यालाही पसंती देत आहेत आणि डोंगराळ प्रदेश, समुद्रकिनाऱ्यांनाही भेटी देत आहेत. नवी दिल्ली, बंगळुरु, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय पर्यटकांमध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय शहरे ठरली आहेत. 3 पर्यटक गोवा, केरळ आणि पाँडिचेरीसारखी लोकप्रिय किनारी पर्यटनस्थळेही निवडत आहेत आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारखे डोंगराळ प्रदेशही. जागतिक महामारीच्या काळात पर्यटकसंख्येत घट अनुभवलेल्या या लोकप्रिय पर्यटन स्थळांना आता यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांचे स्वागत करण्याच्या लक्षणीय संधी उपलब्ध झाल्या आहेत. कॅनडा, युनायटेड अरब एमिरेट्स, युनायटेड किंगडम, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशातील आंतरराष्ट्रीय पर्यटक पर्यटनासाठी भारताचा शोध घेण्यात आघाडीवर आहेत.

एअरबीएनबीचे भारत, आग्नेय आशिया, हाँगकाँग आणि तैवानचे व्यवस्थापकीय संचालक अमनप्रीत बजाज म्हणाले, “जगभरातील एअरबीएनबी पर्यटक भारतात पर्यटनासाठी येण्याचा किंवा या देशाला पुन्हा भेट देण्याचा विचार करत आहेत, ही फार आनंदाची बाब आहे. या क्षेत्राला पुन्हा उभारी मिळण्यास आणि आमच्या होस्टच्या स्थानिक समुदायाला पाठबळ देण्यासाठी ही फार महत्त्वाची बाब आहे. पर्यटन आणि वास्तव्य यातील सीमारेषाही आता धूसर होत आहेत. त्यामुळे, कामाच्या बाबतीत नव्याने आलेल्या या लवचिकतेचा लाभ अनेक पर्यटक घेत आहेत. पर्यटक आमच्या कॅटेगरीज आणि आय अॅम फ्लेक्सिबल अशा टूल्सचा वापर करून नवी ठिकाणे, फारशी माहीत नसलेली ठिकाणे शोधत आहेत आणि यातून नव्या पर्यटन अर्थव्यवस्थेचीही निर्मिती होत आहे. महानगरे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांना मिळणाऱ्या पसंतीत वाढ झाली आहे. म्हणजेच, वर्केशन्स आणि व्हेकेशन्स अशा दोन्ही प्रकारचे पर्यटन वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते. देशभरातील स्थानिक होस्ट आणि भारत सरकारसोबत काम करून सध्याच्या पर्यटन क्रांतीचा लाभ स्थानिक समुदायांना घेता यावा यासाठी त्यांचे साह्य करण्यास आम्ही बांधिल आहोत.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!