google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडागोवा

अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण संघाची ७ वी दैवज्ञ क्रिकेट चषक स्पर्धा यशस्वी

अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण युवा संघाने आपली सातवी दैवज्ञ क्रिकेट चषक स्पर्धा नुकतीच एस.ए.जी मैदान, फातोडी येथे पार पडली या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल प्रेक्टिशनर अॅण्ड निवृत्त लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) विनोद ज्ञानेश्वर साळकर, संगीतकार मुकेश घाटवळ उपस्थित होते.

यावेळी सिमरन संतोष हळदणकर यांना दक्षिण आशिया कराटे चॅम्पियनशीप २०२४ मध्ये कांस्यपदक मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला.

या स्पर्धेत संपूर्ण गोव्यातून एकूण १४ संघासह २ महिला संघानेही सहभाग घेतला होता. अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण असोसिएशन यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष सीमा वेर्णेकर यांनी पाहुण्यांचे आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले आणि असोसिएशनने वर्षभरात केलेले सर्व कार्यक्रम, उपक्रम आणि इतर समाजसेवेची माहिती दिली. लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) विनोद साळकर यांनी अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण संस्थेने अशा प्रकारचे उपक्रम राबविलेल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि अशा कार्यव माला आमंत्रित केल्याबद्दल असोसिएशनचे आभार प्रकट केले. विजेत्या संघासह उपविजेत्या संघाला आणि इतर व्यक्तींना उपस्थित मान्यवरांतर्फे चषक प्रदान करण्यात आले. या भव्य कार्यक्रमात ३०० हून अधिक लोक उपस्थित होते.

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :

पुरुष विजेता संघ –  दामबाब XI,
उपविजेता –डायनॅमिक क्रिकेटर्स,
मालिकावीर – आयुष वेर्लेकर,
सर्वोत्कृष्ट फलंदाज – अमृत वेर्लेकर,
सर्वोत्कृष्ट गोलंदाज – दीप्तेश हळदणकर,
अंतिम फेरीचा सामनावीर – यश कासवणकर,
सर्वोत्तम झेल-मिथील कारेकर,
जास्तीत जास्त षटकार– आयुष वेर्लेकर,
सर्वोत्कृष्ट आगामी खेळाडू – यश कासवणकर,

महिला विजेता संघ – दक्षिण वॉरियर्स,
महिला उपविजेता संघ– बार्देश रिगल्स,
महिला सामनावीर – स्नेहल वाळके
यांना प्रदान करण्यात आले.

वैभवी बांदोडकर व विशाल वेर्णकर यांनी सूत्रसंचालन केले. अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण यांचे साहिल लोटलीकर यांनी आभार मानले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!