अमेझॉन इंडियातर्फे सणासुदीच्या काळात विक्री शुल्कात मोठी घट
अमेझॉन इंडियाने आज विविध उत्पादन श्रेणीच्या विक्री शुल्कात लक्षणीय घट केली आहे. ९ सप्टेंबरपासून ही कपात अमलात येणार असून, त्यामुळे विक्रेत्यांना आगामी सणासुदीच्या काळासाठी सज्ज राहाण्यास मदत होईल. शुल्कात कपात करत अमेझॉनने सर्व प्रकारच्या विक्रेत्यांसह आपले नाते आणखी दृढ करण्याचे ध्येय ठेवले आहे. यामुळे विक्रेत्यांना Amazon.in वरील त्यांची उत्पादन श्रेणी विकसित करण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मदत होणार आहे.
या बदलांमुळे अमेझॉन इंडियावरील विक्रेत्यांना विविध उत्पादन विभागांवरील विक्री शुल्क ३ ते १२ टक्क्यांनी कमी द्यावे लागणार आहे. नवीन रेट कार्डमुळे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत वाजवी दरात उत्पादने उपलब्ध करणाऱ्या विक्रेत्यांना लाभ होणार आहे. उदा. २९९ रुपये किमतीत प्रिंटेट टी-शर्ट मिळवून देणाऱ्या विक्रेत्यांना आता केवळ २ टक्के रेफरल शुल्क द्यावे लागणार असून, ते आधीच्या १३.५ टक्क्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. यामुळे विक्रेत्यांना प्रति युनिट ३४ रुपयांची बचत करता येईल. शुल्कामध्ये झालेली कपात विविध प्रकारच्या उत्पादनांवर लागू असून, त्यात घर सजावट (९ टक्के घट), इनडोअर लायटिंग (८ टक्के घट), गृह उत्पादने (८ टक्के घट) यांचा समावेश आहे.
‘अमेझॉनमध्ये आम्ही लघू ते मध्यम व्यवसाय, उदयोन्मुख उद्योजक ते प्रस्थापित ब्रँड्सपर्यंत सर्व प्रकारच्या व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील असतो. शुल्कामध्ये झालेली कपात थेट विक्रेत्यांकडून विशेषतः लहान व्यवसायांकडून मिळालेल्या प्रतिसादातून करण्यात आली आहे. यासह आम्ही विक्रेत्यांसाठी जास्त लाभदायक यंत्रणा तयार करण्यासाठी लक्षणीय पाऊल उचलले आहे,’ असे अमेझॉन इंडियाच्या सेलिंग पार्टनर सेवा व्यवसायाचे संचालक अमित नंदा म्हणाले.
ही शुल्क कपात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, ती तात्पुरती नाही, असे अमेझॉनने अधोरेखित केले आहे. शुल्कामधील या कपातीमुळे विक्रेत्यांना दिवाळी खरेदीच्या दरम्यान चांगली विक्री करण्याची, तसेच त्यानंतरही आपले यश टिकवून ठेवण्याची संधी मिळेल.
‘विक्रेते, विशेषतः वाजवी दरात उत्पादने विकणाऱ्या विक्रेत्यांना अमेझॉनवरील शुल्कात लक्षणीय कपातीचा लाभ मिळेल. यामुळे त्यांना व्यवसाय विस्तारासाठी पुनर्गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. आम्हाला खात्री आहे की, या बदलांमुळे आगामी सणासुदीचा काळ आणि त्यानंतरही विक्रेत्यांना चांगली कामगिरी करता येईल.’
यांच्या शुल्कात झाली कपात :
विक्रेते शुल्कातील एकंदर कपात वेगवेगळ्या किमतीच्या ५९ उपविभागांमध्ये कमी किमतीच्या उत्पादन विभागांमध्ये रेफरल शुल्कात घट. त्यात गृह, कपडे, स्वयंपाकघरातील वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, वायरेल अक्सेसरीज, ऑफिस उत्पादने, क्रीडा, शूज, लगेज, पाळीव प्राणी, दागिने, सौंदर्य, घड्याळे आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. त्यातील घर, कपडे आणि स्वयंपाकघर या विभागांवर जास्त कपात लागू करण्यात आली आहे.
फुलफिलमेंट सेंटर्स, सेलर फिक्स, ईझी शिप यांसाठीचे वेट हँडलिंग शुल्क त्यांना लागू होणाऱ्या STEP* स्तरानुसार नव्याने तयार करण्यात आले आहे.