
सातारा
त्या बिबट्याच्या पिल्लांची आईशी झाली भेट; हृदयभेट झाली कॅमेऱ्यात कैद
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नांदगाव येथे उसाच्या शेतामध्ये बिबट्याची पिल्ले ऊस तोडताना आढळून आल्याने सदरची पिल्ले वनविभागाने ताब्यात घेऊन त्या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
दरम्यान त्या पिल्लांची आणि आईची भेट घडवून देण्यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले दरम्यान सायंकाळी आई आणि बिबट्याच्या पिल्लांची भेट घडवण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले असून हा सर्व थरारक प्रसंग आणी आई पिल्लांची भेट कॅमेऱ्यात कैद झाली आहे.